नागपूर : नागपूरमध्ये आरोपींना मदत करणा-या ८ पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. हे सर्व पोलीस कर्मचारी नागपूर पोलीस मुख्यालयातले आहेत.
तुरूंगामधून आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी आणणा-या एस्कॉर्टपार्टीमध्ये आठ पोलीस कर्मचारी कार्यरत होते. जेलमधून न्यायालयात सुनावणीसाठी नेत असताना न्यायालयाच्या बाहेर किंवा न्यायालयापर्यंतच्या प्रवासात आरोपींना नियमबाह्य पद्धतीनं आरोपींना मदत करायचे.
आरोपींना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलू देणे, घरच्या वस्तूंसह सिगरेट, गुटखा पुरवत असतं. आणि हेच या पोलीस कर्मचा-यांना महागात पडलंय.