गडचिरोली पोलिसांनी घातलं ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान

 जिल्हा पोलिसांनी सिरोंच्या तालुक्यात ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

Updated: Dec 6, 2017, 01:18 PM IST
गडचिरोली पोलिसांनी घातलं ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान title=

गडचिरोली : जिल्हा पोलिसांनी सिरोंच्या तालुक्यात ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश

सीमावर्ती भागातल्या झिंगानूर पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पुढे आलं आहे. मारल्या गेलेल्या नक्षलींमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.

पोलिसांना मोठं यश

बुधवारी पहाटे झालेल्या या चकमकीत पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असतांना पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत कल्लेडच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांच्या सी-60 पथकाने भल्या पहाटे ही कारवाई केली. नक्षल्यांना याची माहिती मिळताच त्यांनी गोळीबार सुरू केला.