Holi 2024 : होळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी 12 स्पेशल गाड्या, आजच करा बुकिंग

Holi Special Trains : होळीला गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता मध्य रेल्वेकडून आणखी 12 होळी स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन कधी आणि कुठून सुटणार ते जाणून घ्या...

श्वेता चव्हाण | Updated: Mar 17, 2024, 03:58 PM IST
Holi 2024 : होळीसाठी मध्य रेल्वेच्या आणखी 12 स्पेशल गाड्या, आजच करा बुकिंग  title=

Holi Special Trains in Marathi : अवघ्या आठड्याभरातच होळी सण येऊन ठेपला आहे.  यासाठी आतापासून कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग देखील सुरु झाली आहे. अशातच होळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मध्य रेल्वेने आणखी एकदा आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी विविध मार्गांवर होळी स्पेशल 112 ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यात आणखी 12 होळी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गावर धावतात. 

अनेकजण आपापल्या गावी जाऊन नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत विविध सणांचा आनंद लुटण्याचा बेत आखतात. मात्र, लांबपल्ल्याचा प्रवास त्यातच ट्रेनला असणार गर्दी पाहत ट्रेनचं आरक्षण मिळणं देखील कठीण होऊन जातं. ट्रेनने लांबपल्ल्याचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो. म्हणून गणपती सण असो किंवा होळीचा उत्सव असो, कोकणवासियांची पहिली पसंती ही ट्रेनच्या प्रवासाला असते. याचदरम्यान कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने आणखी 12  होळी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला.  या 12 विशेष गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावतील. परिणामी मध्य रेल्वेवर आता होळी स्पेशल गाड्यांची संख्या 124 वर गेली आहे. या स्पेशल गाड्यांचे आरक्षण शनिवारपासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.

01215 सीएसएमटी- दानापूर होळी स्पेशल ट्रेन 21 मार्च 2024 ला सीएसएमटी येथून सकाळी 11.25 वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता पोहचेल. 

ट्रेन क्रमांक 01216

22 मार्च 2024 रोजी दानापूर येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटेल  आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 3.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01083

सीएसएमटी- गोरखपूर होळी स्पेशल ट्रेन 22 मार्च 2024 रोजी सीएसएमटी मुंबईहून रात्री 10.35 वाजता सुटेल  आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01084

24 मार्च 2024 रोजी गोरखपूर येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता सीएसएमटी येथून रोझी निघते.

ट्रेन क्रमांक 01084

पुणे-दानापूर-पुणे फास्ट होळी स्पेशल ट्रेन 21 मा0र्च 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.40 वाजता दानापूरला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01472

होळी स्पेशल ट्रेन 22 मार्च 2024 रोजी दानापूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.45 वाजता सुटेल आणि पुन्याळा येथे पोहोचेल. पुणे-गोरखपूर-पुणे फास्ट होळी स्पेशल ट्रेनच्या दोन फेऱ्या आणि पनवेल-छपरा-पनवेल साप्ताहिक होळी स्पेशल ट्रेनच्या चार फेऱ्या आहेत.