राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पांना तत्वतः मान्यता

राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.

Updated: Nov 14, 2017, 07:57 PM IST
राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पांना तत्वतः मान्यता  title=

नवी दिल्ली : राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यासाठी लवकरच केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करार होणार आहे.

सुमारे १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक त्यात अपेक्षित असून, मराठवाडा आणि विदर्भावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर दुसरीकडे रेल्वेमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत रेल्वेचे रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरू असून १० दिवसांत अहवाल तयार करण्याचे आदेश गोयल यांनी दिले. तसंच इंदूर-मनमाड रेल्वे पुढे मुंबईला जोडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.