Maha Vikas aghadi press conference Nana Patole: लोकसभा निवडणुकीचे (Loksabha election 2024) पडघाम वाजले असताना लवकरच पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षावर जोरदार घणाघात करत टिका केली आहे.
कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसचे मोठे योगदान होते. सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसतानाही तासनतास त्यांनी ईडी कार्यालयात बसवून ठेवले. देशातून भाजपच सरकार आणि नरेंद्र मोदींची सत्ता बाहेर काढण्याचा आमचा पहिला प्रयत्न असणार आहे. केंद्राच सरकार हे भ्रष्ट्राचारी सरकार आहे. मोदी हे फक्त कॉंग्रेस पक्षाला शिव्या देत असातात, अशा घणाघात नाना पटोले यांनी मोदींवर केला आहे.
महाविकासातील मत एकमेकांना जाणार का? असा प्रश्न नाना पटोलेना विचारला असता, राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी मोठं मन केल असून भाजपचे पाणीपत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. आमचे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असे यावेळी पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच कॉंग्रेसची मतं ही महाविकासातील एकमेकांना दिली जाणार. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी ही खरी आहेत. कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते महाविकासाच्या जागा निवडूण आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असं पटोले म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती होती.
ठाकरे गट
बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक - राजाभाई वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत
मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई
वैशाली दरेकर : कल्याण
सत्यजित पाटील : हातकणंगले
करण पवार : जळगाव
भारती कामडी : पालघर
काँग्रेस
रामटेक- प्रफुल्ल बर्वे
नागपूर- विकास ठाकरे
भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोले
गडचिरोली - नामदेव किरसन
लातूर- शिवाजी काळगे
सोलापूर- प्रणिती शिंदे
कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती
पुणे- रविंद्र धंगेकर
नांदेड - वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे
नंदुरबार- गोवाल पाडवी
अकोला- डॉ. अभय पाटील
चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर
धुळे- उमेदवार घोषित नाही
जालना- उमेदवार घोषित नाही
उत्तर-मध्य मुंबई-उमेदवार घोषित नाही
उत्तर मुंबई- उमेदवार घोषित नाही
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
वर्धा- अमर काळे
दिंडोरी- भास्कर भगरे
बारामती- सुप्रिया सुळे
शिरूर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके
बीड- बजरंग सोनावणे
भिवंडी- सुरेश उर्फ
सातारा- उमेदवार घोषित नाही
रावेर- उमेदवार घोषित नाही
माढा- उमेदवार घोषित नाही