जगातील सर्वात विचित्र सीमा

जगातील सर्वात विचित्र सीमा कुठल्याही देश जितका आपल्या संस्कृतीमुळे ओळखला जातो, तेवढाच आपल्या भौगोलिक रचना आणि समांमुळे. जगात प्रत्येक देशाची एक विशिष्ट सीमा आहे. पण, यापैकी काही सीमा अशा आहेत ज्या शोधूनही सापडणार नाहीत.

Updated: Feb 15, 2024, 04:01 PM IST
जगातील सर्वात विचित्र सीमा title=

व्हिक्टोरिया फॉल्स: झांबिया आणि झिम्बाब्वे
व्हिक्टोरिया फॉल्स हा झाम्बेझी नदीवर आहे. झांबिया आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांच्या सीमांना झाम्बेझी नदी जोडते. जगातल्या सर्वात मोठ्या धबधबा असलेल्या यादीत व्हिक्टोरिया फॉल्सचं नाव जोडलं जातं. हा धबधबा 100 मीटरपेक्षा उंचावर असल्याने इथं धुकं मोठ्या प्रमाणात असतं. या दोन देशांच्या सीमांवर असलेला धबधबा अनेकांचं लक्ष वेधून घेतो.

बीर-तावील: इजिप्त आणि सूडान
बीर-तावील हा प्रदेश इजिप्त आणि सूडान या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे. बीर-तावीलचा परीसर निर्जन मनुष्यवस्तीचा आहे. विशेष म्हणजे या प्रदेशावर दोन्ही देश आपला मालकी हक्क सांगत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशावर वाळवंट असून कोणतीही जीवसृष्टी या परीसरात आढळत नाही.

हॅस्केल लायब्ररी आणि ऑपेरा हाऊस: अमेरिका आणि कॅनडा


कला, संस्कृती आणि बौद्धिक साहित्याची देवाणघेवाण करता यावी, या हेतूने अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांनी एकत्र येत या वास्तूची उभारणी केली. हॅस्केल लायब्ररी आणि ऑपेरा हाऊस या वास्तू दोन्ही देशांच्या सीमेवर बांधले गेले आहे. याचे विशेष आकर्षण म्हणजे हॅस्केल लायब्ररीचं प्रवेशद्वार हे युएसमध्ये आहे तर  पुस्तकं कॅनडामध्ये आहेत. त्याशिवाय ऑपेरा हाऊसचा रंगमंच हा कॅनडामध्ये तर प्रेक्षकगृह युएसमध्ये आहे.

हॉटेल अर्बेझ: फ्रान्स आणि स्वित्झर्लंड

हॉटेल अर्बेझ हे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या सीमेवर असल्याने इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांना फ्रान्स आणि स्वित्झर्लंड दोन्ही देशांच्या संस्कृती अनुभवण्यास मिळते.

इग्वाझू फॉल्स: अर्जेंटिना आणि ब्राझील


इग्वाझू धबधबा हा अर्जेंटिना आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे. इग्वाझू या नदीवर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. इग्वाझू नदीचं खोरं हे मोठ्या जंगलाने वेढलेले असून अॅडव्हेंचर करण्यासाठी अनेक गीर्यारोहक या ठिकाणाला भेट देतात. अर्जेंटिना आणि ब्राझील देशांच्या सीमेवर असलेल्या या जंगलसफारीला पर्यटकांची कायम पसंती असते.

कोरियन DMZ: उत्तर आणि दक्षिण कोरिया


कोरियन DMZ हे द्वीपकल्प सुमारे 240 किमी क्षेत्रात पसरलेलं असून उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे.

सॅन डिएगो-टिजुआना: अमेरिका आणि मेक्सिको


सॅन डिएगो-टिजुआना हा प्रदेश अमेरिका आणि मेक्सिको या दोन्ही सीमांवर वसलेला आहे. या प्रदेशात दोन्ही देशांचे नागरीक वास्तव्य करतात. या सीमेवर दोन्ही देशांच्या पोलीस चौक्या आहेत. दोन्ही देशांच्या सीमा वेगळ्या असल्या तरी इथं वास्तव्यास असलेलं लोकजीवन सुरक्षित आहे.