नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. 

नेहा चौधरी | Updated: Dec 2, 2023, 11:15 AM IST
नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का? title=
Why does Navradeva or groom sit only on a mare and not on a female horse And why the mare in white wedding Hindu Rituals

Wedding Rituals : लग्नाचा सिझन सुरु झाला असून पुढील 23 दिवसात 35 लाख लग्न होणार आहेत. एका रिपोर्टनुसार 4.25 कोटींची उलाढाल फक्त या लग्न समारंभातून होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. लग्न हे दोघांचं मनोमिलनसोबत दोन कुटुंबाचा सोहळा...पण गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाचा हा सोहळा एक भव्यदिव्य सोहळा आणि कोटी रुपयांची उधळणपट्टी झाली आहे. असो, प्रत्येक समाजानुसार लग्नाच्या पंरपेरा आणि रीतिरीवाज पाळले जातात. नुकतच अभिनेता रणदीप हुड्डा याने लिनशी मणिपुरी पद्धतीने लग्न केलं. या सोहळ्यातील फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (Why does Navradeva or groom sit only on a mare and not on a female horse And why the mare in white wedding Hindu Rituals)

 ब्यांड बाजा, वरात घोडा घेउनि या नवरोजी..!

मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातील गाणं ब्यांड बाजा, वरात घोडा घेउनि या नवरोजी लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई, हे गाणं आठवतं का? नवरदेव म्हटला की तो पांढऱ्या शुभ्र घोडीवर आपल्या नवरीला घ्यायला येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की नवरदेव मग तो घोडीवर का येतो घोड्यावर का येत नाही. तेही पांढऱ्या घोडीवर का?

नवरदेव घोडीवरच का बसतो; घोड्यावर का नाही?

साधारण असं म्हटलं जातं की, घोडा हा रागीट स्वभावाचा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घोड्यावर सैर करणं खूप कठीण असतं. त्याशिवाय घोडा हा चपळ असो त्यामुळे पूर्वी त्याचा उपयोग युद्धभूमीवर केला जातो. पण लग्न सोहळा हा आनंदाचा सोहळा असल्याने इथे रागीट, चपळ आणि शक्तिवान या गुणांचा काही उपयोग नसतो. तर घोडी ही शांत स्वभावाची असते. त्यामुळे लग्न सोहळ्यात नवरदेव घोडीवर बसून येतो. 

घोडीवर बसण्यामागे कारण की...

लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि त्याचा अर्थ मुलगा नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. वैवाहिक आयुष्याची जबाबदारी उचलण्यास सक्षम आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी नवरदेवाला घोडीवर बसवण्याची प्रथा आहे, असं एक रीत आहे. 

नवरदेव पांढऱ्या घोडीवर का बसतो?

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, नवरदेव पांढऱ्या घोडीवरुन येतो. पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. शिवाय शुद्धता, प्रेम, उदारता, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हे गुण नव्या आयुष्याची सुरुवात करताना सकारात्मक ऊर्जा देतात. त्यामुळे नवरदेव बोहल्यावर चढताना पांढऱ्या रंगाच्या घोडीचा उपयोग केला जातो. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती साधारण माहितीच्या आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. )