Savitribai Phule Death Anniversary 2024 Speech : सावित्रीबाई फुले एक भारतीय समाजसुधारक, कवयित्री आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शक्तिशाली आवाज होत्या. त्यांनी महिला आणि दलित समाजाच्या मुक्तीसाठी अथक परिश्रम केले. भारतीयांच्या पिढ्यांना प्रेरणा दिली. 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 64 व्या वर्षी प्लेगशी लढत असताना सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भाषण किंवा स्पर्धेत सहभागी होताना खालील दोन नमुन्यांचा विचार करायला हवा.
आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र व मैत्रिणिंनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे उपस्थित आहोत. मैत्रिणिंनो महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कहाणी तुम्हाला नक्कीच माहित असेल. ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून पाच किमी अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या, त्या माळी समाजातील होत्या. सावित्रीबाई फुले यांचा वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते.
ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी 18 शाळा उघडल्या. असे म्हणतात की, सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत.
सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले.
त्यावेळी मुलीचा बालविवाह होत व ती विधवा झाली तर तिचे केस मुंडण करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते . त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवांसाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले.
असे म्हणतात की त्यावेळी भयंकर प्लेग पसरला, सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?
ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं. ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे. फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला माझा हात घर-घर कापत होता. या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे 'शेठजीच'.
एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली 1 जानेवारी होय. शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनांचा मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.
शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले, शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या 'शिकविण पोरीना' असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला, 'ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते. मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल शिव्या दिव्या दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.
दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं. ४ वर्षातच आमच्या १८ शाळा झाल्या पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या .अश्यातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.
म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या, विचार करू दया कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते बरं येते ह मी .
जय हिंद जय महाराष्ट्र .