B Letter Hindu Baby Girl Names List: घरात बाळाचा जन्म झाला की, शोध सुरु होतो नव्या नावांचा. प्रत्येक पालकांना आपल्या बाळासाठी गोड आणि अतिशय युनिक नाव हवे असते. जर तुमच्या घरी चिमुकल्या तान्हुलीचं आगमन झालं असेल तर नव्या नावांचा शोध नक्की घ्या. कारण हिंदू धर्मात अनेक युनिक अशी नावे आहेत. अनेक पालक मुलांना खास अक्षरावरुन नाव ठेवण्याचा विचार करतात. कधी हे नाव जन्मपत्रिकेवरुन ठरवलं जातं किंवा कधी पालक एखादं अक्षर देऊन मुलीचं नाव ठेवण्याचा विचार करतात. अशावेळी जर तुम्ही 'ब' म्हणजे इंग्रजीतील 'B' या आद्याक्षरावरुन मुलीचे नाव शोधत असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. या नावांमध्ये हिंदू मुलींची अतिशय युनिक आणि ट्रेंडी नावे आणि त्याचा अर्थ पाहू शकता.