कडक उन्हाळ्यात AC, Cooler नाही? अशी मिळवा अल्हाददायक झोप

चांगल्या आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची असते. मात्र गरमीच्या दिवसात रात्री उकाड्याने झोप लागत नाही. त्यामुळे निद्रानाश होऊन याचा परिणाम रोजच्या दिवसभरातल्या कामकाजावर होत असतो. त्याच्याशिवाय झोप पूर्ण न झाल्याने अ‍ॅसिडीटी, चिडचिड होणं ,दुखणं यासांरख्या त्रासाला सामोरं जावं लागतं. 

Updated: May 21, 2024, 06:57 PM IST
कडक उन्हाळ्यात AC, Cooler नाही? अशी मिळवा अल्हाददायक झोप title=

चांगल्या आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची असते. मात्र गरमीच्या दिवसात रात्री उकाड्याने झोप लागत नाही. त्यामुळे निद्रानाश होऊन याचा परिणाम रोजच्या दिवसभरातल्या कामकाजावर होत असतो. त्याच्याशिवाय झोप पूर्ण न झाल्याने अ‍ॅसिडीटी, चिडचिड होणं ,दुखणं यासांरख्या त्रासाला सामोरं जावं लागतं. 

ऊन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपताना काय काळजी घ्यावी ? 

बऱ्याच जणांना ऊन्हाळ्यात एसीशिवाय झोप लागत नाही. तर अनेकांना एसीची हवा सहन होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी उकाड्यात एसीशिवाय वातावरण थंड कसं ठेवावं हे जाणून घेऊयात. 

कॉटर्नच्या कपड्यांचा वापर 
सहसा ऊन्हाळ्यात रात्री झोपताना सैलसर आणि कॉटर्नच्या कपड्यांचा वापर करावा. त्यामुळे रात्री झोपताना शरीराचं तापमान बॅलन्स रहायला मदत होते. 

माठातील पाणी पिणे 
रात्री झोपण्यापूर्वी फ्रीजमधील थंड पदार्थ न खाता माठातील पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ऊन्हाळ्यात घामावाटे  क्षार बाहेर पडतात. त्याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणूनच माठातील पाणी प्यायल्याने रात्री झोपताना शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे निद्रानाश सहसा होत नाही. 

झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ करा 
रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात घामावाटे  क्षार बाहेर पडतात. शरीराचं तापमान वाढलं की, घामावाटे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात.
 त्यामुळे झोपण्यापूर्वी शरीर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असतं. झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ केल्याने गरमीनं वाढणारं शरीरातील तापमान कमी करण्याठी अंघोळ फायदेशीर असते. 

अल्कोहोलचे सेवन टाळावं 
गरमीच्या दिवसात अल्कोहोलचं सेवन करणं टाळावं. अल्कोहोलमुळे शरीरात अतिरिक्त उष्णता वाढते. त्यामुळे शरीरातील तापमान वाढतं. यामुळे निद्रानाश, डोळे लाला होणं, अश्या समस्या होतात.

खिडक्या उघडून ठेवाव्यात 
सहसा रात्रीच्या वेळी झोपताना खिडक्या उघडून ठेवाव्यात. घरात हवा खेळती राहिल्याने घरातील तापमान कमी राहण्यास मदत होते. तुम्ही जर बिल्डींगमध्ये राहत असाल तर रात्रीच्या वेळी बाल्कनीच्या काचा उघड्या ठेवून झोपा. 

ओल्या टॉवेलचा वापर
रात्रीच्या वेळी झोपताना शक्यतो टेबल फॅनचा वापर करावा. टेबल फॅनवर ओला टॉवेल टाकल्याने थंड हवा निर्माण होते. रात्रीच्या वेळी स्लॅपची उष्णता खाली उतरते. त्यामुळे शक्यतो टेबल फॅनचा वापर करावा.