Makar Sankranti 2024 :...म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण?

Makar Sankranti 2024 : हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक उत्सवाचं आपल वैशिष्ट्य आहे. सण म्हटलं की, वैशिष्ट पोशाख आणि साड्यांची परंपरा आहे. नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या तर मकर संक्रांतीत काळी साडी परिधान करतात. पण मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?  

नेहा चौधरी | Updated: Jan 9, 2024, 12:10 AM IST
Makar Sankranti 2024 :...म्हणून मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात, तुम्हाला माहिती आहे कारण? title=
Makar Sankranti 2024 wear clothes black on Sankranti do you know why

Makar Sankranti 2024 : पौष महिन्यातील सूर्य राशी संक्रमण ही मकर संक्रांती म्हणून ओळखली जाते. साधारण 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षानुसार यंदाही मकर संक्रांतीचा सण हा 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. शास्त्रानुसार शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो. शुभ कार्यात काळा रंगाचे कपडे परिधान केले जात नाही. मग मकर संक्रांतीच्या सणाला काळा रंगाचे कपडे का परिधान करतात, यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? (Makar Sankranti 2024 wear clothes black on Sankranti do you know why) गूढ, आक्रमक, नकारात्मकता आणि शोकाचं प्रतिनिधित्व करणारा असला तरीही काळ्या रंगाचं आकर्षण आजही अनेकांना आहे. त्यामुळंच मकरसंक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो. 

पौराणिक कारण...

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत गोचर करतो. त्यामुळेच या संक्रमणाला मकर संक्रांत असं संबोधल जातं. सूर्यदेव मकर संक्रांतीला उत्तरेला सरकतो म्हणून याला उत्तरायण असंही म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा हा दिवस सर्वाधिक थंड मानला जातो. त्यानंतर थंडी कमी होते. त्याशिवाय सूर्य संक्रमणमध्ये रात्र मोठी होते आणि दिवस छोटा होतो. मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्यामागे एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. त्यानुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलं असतात. त्यामुळे मकर संक्रांतीला काळे रंगाचे कपडे शुभ मानतात. 

...यामुळे काळे कपडे परिधान करतात

हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व दिलं गेलं आहे. काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणानुसार मकर संक्रांतीचा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असल्याने या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात.

हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला 'या' रंगाची साडी व बांगड्या चुकूनही घालू नका!

हे आहे वैज्ञानिक कारण

मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. त्यानुसार काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. त्याशिवाय मकर संक्रांतीला थंडीपासून बचाव व्हावा म्हणून तीळ खाल्ले जातात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)