Mahashivratri 2024 Rangoli Designs : महाशिवरात्रीला दारात काढा ही खूप सोपी आणि सुंदर रांगोळी

Mahashivratri Rangoli Designs 2024 Images, Pics, Photos and Video : भारतात रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. दररोज सकाळी घराच्या मुख्य दारात किंवा अंगणात आजही रांगोळी काढण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीच्या स्वागतासाठी दारा काढा सोपी आणि सुंदर अशी रांगोळी. 

नेहा चौधरी | Updated: Mar 4, 2024, 04:11 PM IST
Mahashivratri 2024 Rangoli Designs : महाशिवरात्रीला दारात काढा ही खूप सोपी आणि सुंदर रांगोळी title=
Mahashivratri Rangoli Designs 2024 Images Pics Photos and Video easy beautiful and simple Rangoli Designs

Mahashivratri Rangoli Designs 2024 Images, Pics, Photos and Video :  भारतात दररोज घराच्या मुख्य दारात किंवा अंगणात रांगोळी काढण्याची परंपरा आहे. सण, उत्सव असो किंवा एखाद शुभ कार्य यानिमित्तानेही रांगोळी काढली जाते. हिंदू धर्मात रांगोळी ही शुभ गोष्टीच प्रतिक आहे. दारात रांगोळी असेल तर तुमचं त्या घरात स्वागत आहे. मात्र दररोज दिसणारी रांगोळी एखाद दिवशी दिसली नाही. तर त्या घरात काहीतरी अनपेक्षित दु:खत घटना घडली आहे, असा त्याचा अर्थ धरला जातो. भारतातील अनेक शहरात आणि गावपाड्यात आजही दररोज रांगोळी काढण्याची परंपरा पाळली जाते. मात्र मोठ्या शहरांमध्ये जिथे इमारतीच महाजाळ आहे. शिवाय प्रत्येक जण नोकरीसाठी घराबाहेर पडतात. अशात रांगोळी काढण्यासाठी वेळ नसतो. पण सण, शुभ कार्य असल्यास आपण आवर्जून आजही रांगोळी काढतो. (Mahashivratri Rangoli Designs 2024 Images Pics Photos and Video easy beautiful and simple Rangoli Designs )

येत्या शुक्रवारी 8 मार्चला देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी महादेव शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाह सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करण्यात येणार आहे. घरोघरी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवासासोबत महादेवाची पूजा करण्यात येणार आहे. अशा या शुभ दिनी माता पार्वती आणि महादेवाच्या स्वागतासाठी तुमच्या दारात सोपी आणि सुंदर अशी रांगोळी काढा. घरातील वातावरण भक्तीमय तर होईलच शिवाय घराची शोभाही वाढेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chaitali's Art (@chaitali_art_n_crafts)

आज आम्ही तुमच्यासाठी महाशिवरात्री काढण्यासाठी सोप आणि सुंदर अशी रांगोली डिझाइन्स आणले आहेत. ज्या लोकांना रांगोळी येत नाही त्यांसाठीही या कल्पना अगदी मनमोहून टाकतील. 

काळा रंग आणि हिरवा रंगाचा वापर करुन सुंदर असं शिवलिंग तुम्ही दारात रेखाटू शकता. 

भगवान शंकराचे आयुध म्हणून त्रिशूळालाची रांगोळी महाशिवरात्रीच्या दिवशी दारात काढल्यास तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. 

महादेवाचे शिवलिंग, नंदी असे धार्मिक चिन्ह काढून तुम्ही रांगोळी काढू शकता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rangoli Designs (@goquirky)

रांगोळीसोबत फुलांची आरास महाशिवरात्रीचा उत्साह द्विगुणीत करेल.