व्हिस्की, रम, वाईन की बियर; सर्वात जास्त नशा कशाने होते?

बऱ्याच लोकांनी व्हिस्की, बिअर आणि वाईन ट्राय केली असेल पण सर्वात जास्त अल्कोहोल  कोणत्या मद्यपानात असते? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 6, 2024, 02:54 PM IST
व्हिस्की, रम, वाईन की बियर; सर्वात जास्त नशा कशाने होते? title=

सध्या अंमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्यामध्ये व्हिस्की, रम, वाईन आणि बिअर हे विशेष प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. त्याचा नशा लवकर किंवा हळूहळू कमी होतो. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणते मद्य सर्वात लवकर नशा देते.

व्हिस्की 

व्हिस्की एक मजबूत मद्य आहे ज्यामध्ये अल्कोहोलची टक्केवारी सामान्यतः 40% पेक्षा जास्त असते. हे मद्य प्यायल्याने व्यक्तीला त्वरित नशा चढते. कारण ते रक्तामध्ये वेगाने पसरते. व्हिस्कीचा नशा हा हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे व्हिस्कीचा नशा बराच वेळ टिकतो. जर तुम्हाला त्यापासून काही वेळातच मुक्त व्हायचे असेल तर जास्त पाणी किंवा ज्यूस प्यावा. 

रम 

रम हे मद्य देखील खूप मजबूत आहे. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण साधारणपणे 35%–40% इतके असते. या मद्याची चव थोडी गोड असते. रम देखील व्हिस्की प्रमाणेच शरीरावर लवकर परिणाम करते. रम थोडी गोड असल्यामुळे लोक ते मोठ्या प्रमाणात पिऊ शकतात. ज्यामुळे नशा जास्त काळ टिकतो. रमची नशा काही काळानंतर कमी होते. परंतु व्हिस्कीच्या तुलनेत थोडा फरक असू शकतो. रमची नशा 4 ते 6 तास राहते.

वाईन

वाईनमध्ये दोन प्रकार आहेत. एक लाल वाईन आणि दुसरी व्हाईट वाईन. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 12%-15% असते. वाईन घेतल्याने अल्पावधीतच नशा चढतो. पण त्याचा परिणाम शरीरावर फार काळ टिकत नाही. वाईनची नशा हळूहळू कमी होते. वाईन घेतल्याने शरीराला ताजेपणा येतो. वाईनची नशा इतर मद्यांपेक्षा लवकर निघून जाते. त्यामुळे वाईन पिणारे लोक लवकर शुद्धीवर येतात.

बिअर 

बिअर ही अनेक लोकांची आवडती आहे. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 4%-7% इतके असते. बिअरचा नशा हळूहळू वाढतो. परंतु हा नशा काही वेळातच कमी होतो. त्यामुळे बिअर पिणाऱ्यांना ती पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटते. बिअरच्या नशेचा शरीरावर अतिशय सौम्य प्रभाव पडतो. म्हणून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बिअर लोक पित असतात.