महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे कायमच आराध्यस्थानी आहेत. महाराजांचे विचार अंगिकारणे आवश्यकच आहे. सोबतच महाराजांची प्रत्येक गोष्ट जीवनात स्वीकारणं हे महत्त्वाचे असते. अशावेळी अनेकजण मुलींना नाव निवडताना महाराजांच्या मुलींच्या नावांचा विचार करु शकता.
छत्रपती शिवाजी महाराज यांना संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे दोन पुत्र आहे. हे सगळ्यांनाच माहित आहेत. पण महाराजांना सहा कन्या देखील आहेत. महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा मुली होत्या.
सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर अशी त्यांची पूर्ण नावे आहेत.
सखुबाई - सखु या नावाचा अर्थ आहे कर्तव्यदक्ष, जबाबदार व्यक्ती. सखु हे नाव तुम्हाला जर थोडं जुनं वाटत असलं तर तुम्ही 'सखी' या नावाचा विचार करु शकता. मित्र, एक चांगला सहकारी आणि विश्वासू मित्र असा देखील याचा अर्थ आहे.
राणूबाई - स्वर्ग असा या नावाचा अर्थ आहे. 'राणू' हे नाव देखील थोडं युनिक आहे. मुलीसाठी महाराजांच्या विचारांच्या नावाचा विचार करत असाल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे.
अंबिका - अंबिका या नावाचा अर्थ आहे आई, उत्तम व्यक्तीमत्त्व असा देखील याचा अर्थ आहे. अंबिका हे नाव दुर्गेचं देखील एक नाव आहे. त्यामुळे मुलीसाठी नक्की या नावाचा विचार करु शकता.
दिपा - दिपा हे नाव देखील अतिशय युनिक नाव आहे. तेजस्वी देवी लक्ष्मी, प्रकाशमय असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव मुलीसाठी नक्कीच निवडू शकता.
राजकुंवरबाई - राजकुंवरबाई हे नाव अतिशय वेगळं नाव आहे. मुलीसाठी राज हे नाव निवडू शकता. राज, राजकमल अशी मुलींची नावे असतात.
कमळाबाई - कमळ हे नाव तुम्ही मुलीसाठी निवडू शकता. कमळ हे फूल आहे. तुमच्या फुलासारख्या लेकीसाठी हे खास नावं.
सईबाई निंबाळकर
सोयराबाई मोहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगुणाबाई शिर्के
गुनवातीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड