पती-पत्नीचं हे नातं अतिशय खास असतं. या नात्यावर दोन व्यक्तीचं भविष्य अवलंबून असतं. अशावेळी काही चुका ठरवून टाळल्या पाहिजेत. या सगळ्या प्रकरणावर आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये काही टिप्स शेअर केले आहेत. हे टिप्स फॉलो केले तर पती-पत्नीमध्ये कधीच वाद, भांडण, तंटा होणार नाही. एवढंच नव्हे तर त्यांचं नातं अधिक आनंदाने बहरेल. चाणक्य नीतीने फक्त व्यवहारच नाही तर खासगी आयुष्यावरही भाष्य केलं आहे. त्यामुळे तुम्ही सुखी जीवनासाठी नेमकं कसं वागायचं हे देखील चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आलंय.
कोणत्या विषयावर वाद घालता?
पती-पत्नीने आपल्याशी संबंधित नसलेल्या विषयांवर वाद घालू नयेत. व्यर्थ विषयांवर वाद घालू नये. त्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी निगडीत विषयांवरच संभाषण व्हायला हवे. वादविवाद करताना सन्मान आणि शिस्त विसरता कामा नये. चाणक्याच्या मते, निरुपयोगी गोष्टींवर वाद घालणे ऊर्जा वाया घालवते. कारण अनेकदा जोडीदारासोबत वाद झाल्यानंतर लक्षात येतं की, आपण दुसऱ्याच्या मुद्द्यावर वाद केलाय. त्यामुळे वाद करताना पहिला मुद्दा काय आहे हे समजून घ्या.
पती-पत्नीचा आदर वेगळा नाही. त्यामुळे वैयक्तिक सन्मानाच्या भावनेचा त्याग केला पाहिजे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीला समान आदर असतो. म्हणून, सुज्ञ जोडपे कधीही एकमेकांच्या उणीवा अधोरेखित करत नाहीत तर उणीवा दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करतात. कारण सन्मान तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होते. तसेच आदर केल्यामुळे एकमेकांचा सन्मान करणे यामुळे तुम्ही माणूस म्हणून एकमेकांकडे पाहता.
चाणक्यच्या मते, व्यक्तीने कधीही त्याच्या टीकेला घाबरू नये. तुम्ही टीका स्वीकारून तुमच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पती-पत्नीने एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर टीका केली तर त्यांनी ती स्वीकारून ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टीकेमध्ये प्रेमाची भावना असली पाहिजे. ही प्रेमाची भावना सुधारण्याचे लक्षण आहे. एकमेकांशी अपशब्द किंवा चुकीचे शब्द बोलू नका. मात्र एखादी गोष्ट न पटल्यास बोला, टीका करा. कारण यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट असते.
अनेकदा पती-पत्नीच्या नात्यामध्ये चर्चाच होत नाही आणि हेच असतं वादाचं कारण. एकमेकांशी संभाषण केल्यावर आपापले मुद्दे स्पष्ट होतात. यामुळे जर गैरसमज झाले असेल तर ते दूर होते. त्यामुळे प्रत्येक विषयावर चर्चा करा. कारण बोलून प्रश्न सुटतात.