Mansoon Vegitable Shopping : पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. सूर्यप्रकाश जास्त मिळत नसल्यानं पालेभाज्या आणि फळंभाज्यांना किड लागते.
रोगराईचं साम्राज्य जास्त असल्यामुळं पावसाळ्यात बाहेरील अन्न पदार्थ आणि मासांहारी खाणं सहसा टाळावं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. त्याऐवजी तुम्ही भाज्यांचा आहारात समावेश करु शकता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पावसाळ्यात बाहेरील वातावरण आणि जीवजंतूंमुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.
असं म्हणतात की, त्या त्या सिझनमध्ये येणारी फळं आणि भाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पावसाळ्यात य़ेणाऱ्या रानभाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. त्यामुळे भाज्या विकत घेताना त्या पारखून घ्या. सततच्या पावसामुळे पालेभाज्या लवकर खराब होतात. पाण्यामुळे भाज्यांना पावसात किड लागते. म्हणूनच जर तुम्ही पावसाळ्यात भाज्या विकत घेताना काही सोप्या टीप्स वापरु शकता.
भेंडी
पावसाळ्यात भेंडी खरेदी करताना भेडींचं टोक तोडून पहावं. जर भेंडीचं टोक तुटलं तर ती भेंडी ताजी आहे असं समजा. जर तुम्ही घेत असलेल्या भेंडींच टोक मोडत नसेल तर अशी भेंडी खूप दिवसाची आहे, हे लक्षात येतं. त्यामुळे भेंडी घेताना याचा विचार नक्की करा.
वांग
भरलेलं वांग, वांगी भात किंवा वाग्यांची भाजी खाणं बऱ्याच जणांना आवडतं. पण जर तुम्ही पावसाळ्यात वांग खात असाल तर सावधगिरी बाळगा. सूर्यप्रकाश जास्त मिळत नसल्यानं पालेभाज्या आणि फळंभाज्यांना किड लागते. त्यामुळे वांगी घेताना तिला चिरा पडल्या नाहीत ना हे तपासून घ्या. चिरा पडलेल्या वांग्याला किड लागलेली असते. त्यामुळे वांगी घेताना खबरदारी घ्या.
दुधीभोपळा
पावसाळ्यात दुधीभोपळ्याचा आहारात समावेश करावा. दुधीभोपळ्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे ताप आणि खोकला सारखे आजार दूर होतात. आजारी व्यक्तीला दुधीचं सूप दिल्याने अशक्तपणा दूर होतो. मात्र दुधीभोपळा विकत घेताना तिचं वजन तपासून घ्या. जर दुधी कोवळी असेल तर ती ताजी असते. कोवळ्या दुधीमुळे शरीराला पोषकतत्त्व मिळतात. जर दुधी वजनाने जड असेल तर ती खूप जास्त पिकलेली असते, त्यामुळे दुधी विकत घेताना ही टिप्स वापरुन पाहा.
कांदे
बऱ्याच जण एकाचवेळी जास्त कांदे विकत घेतात. यामुळे होतं असं की, कांदे लवकर खराब होतात. कांदे फार काळ ताजे राहत नाही. बाजारात कांदे खरेदी करताना ते ताजे आहेत की खराब हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. कांदे विकत घेताना त्याच्या शेंड्याला जोरात दाबून पाहा. जर कांदा नरम असेल तर तो खराब आहे हे समजावं. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या कांद्याची खरेदी करु शकता.