किचनमधून आजच बाहेर काढा 'या' 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण घर पडेल आजारी

तुम्हाला किचनमधील अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही टाळायला हवा अन्यथा आरोग्य बिघडू शकते. 

Updated: Aug 30, 2024, 09:12 PM IST
किचनमधून आजच बाहेर काढा 'या' 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण घर पडेल आजारी title=
(Photo Credit : Social Media)

Kitchen Tips : कधी फॅशन तर कधी जाहिरातींना बळी पडून घरासाठी खूप काही गोष्टी विकत घेतल्या जातात. काहींचा घरासाठी खरंच उपयोग होतो तर काही वेळा नकळतपणे या गोष्टींचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. तुम्हाला किचनमधील अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही टाळायला हवा अन्यथा आरोग्य बिघडू शकते. 

सेंटेड कँडल्स :

scented candels

सेंटेड कँडल्स मागील काही वर्षांपासून लग्झरी आणि फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. स्पा सेंटर किंवा मोठं मोठ्या हॉटेल्समध्ये वातावरण सुगंधित आणि प्रसन्न करण्यासाठी या सेंटेड कँडल्सचा वापर केला जातो. परंतु सेंटेड कँडल्स जर तुमच्या घरात असतील तर त्याचा वापर त्वरित थांबवा. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सेंटेड कँडल्सच्या आत थेलेट्स असतात. थेलेट्स हार्मोन लेव्हल खराब करण्यासाठी ओळखले जातात. याशिवाय याच्या सतत वापरामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेतही त्रास होतो. तुम्ही सेंटेड कँडल्स ऐवजी नैसर्गिक सोया किंवा मेणापासून बनवलेल्या मेणबत्त्या वापरू शकता. 

हेही वाचा : यंदा गणेशचतुर्थीला बनवा खुसखुशीत साटोऱ्या, पारंपारिक व झटपट होणारी रेसिपी वाचा

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड :

Chopping Board

किचनमध्ये अनेकजण भाज्या चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डाचा वापर करतात. मात्र हे चॉपिंग बोर्ड आजारपणाचा कारण ठरू शकतात. प्लास्टिक चॉपिंग बोर्डच्या वापरामुळे शरीरात माइक्राेप्‍लास्‍टिक जाऊ शकते. तेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी लाकूड किंवा स्टेनलेस स्टीलचे चॉपिंग बोर्ड वापरू शकता. 

नॉन स्टिक तवा :

Nonstick Pan

अनेक घरांमध्ये पूर्वी एल्‍यूम‍िनियम, लोखंड, स्टील इत्यादी धातूंच्या भांड्यांचा वापर व्हायचा. मात्र आता या भांड्यांची जागा ही नॉन स्टिक भांड्यांनी घेतली आहे. नॉनस्टिक भांड्यात पदार्थ चिकटत नाही तसेच कमी तेलात पदार्थ तळला जातो म्हणून अनेकजण नॉन स्टिक भांड्यांचा वापर करतात. परंतु वारंवार वापरल्याने नॉनस्‍ट‍िक तव्यावर स्‍क्रॅच येतात तसेच ही भांडी खराब होऊन जातात. अशा खराब नॉनस्टिक तव्यामध्ये पीएफए ​​असते, जो उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलशी जोडलेला असतो. या खराब तव्याचा वापर दीर्घकाळ केल्याने याचे कण निघतात जे भविष्यात पुनरुत्पादक समस्यांसाठी देखील कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा नॉनस्टिक तव्या ऐवजी तुम्ही लोखंडाचे तवा वापरणं योग्य ठरतं. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)