मुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या
Mumbai Goa Highway Bad condition: मुंबई-गोवा महामार्गावर बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही वेळातच महिलेने वेदनेने आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच बसमधील इतर प्रवाशांनाही याची जाणीव झाली.
कोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू झालेय. यामुळे कोकणात जाणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्यामुळे प्रवाशांचा 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्याऱ्यांकडून दीडपटीहून अधिक भाडं आकारल्यास होणार कारवाई
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची लुट थांबणार आहे. अधिक भाडे आकरणाऱ्यांना चाप बसणार आहे.
शालेय स्पर्धेत डोक्यात लागला भाला, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; रायगड येथील धक्कादायक घटना
Raigad News: रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेत एक अघटित घटना घडल्याने 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड येथील माणगाव परिसरात ही घटना घडली आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
बाप्पा पावला! गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी
मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. हायवेचं काम जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय.
कोकणातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराने लागू केला ड्रेस कोड; तोकडे कपडे घालणाऱ्यांना ट्रस्ट देणार वस्त्रे
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरात आता वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात आली आहे. मंदिरात अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यास त्यांना ट्रस्ट वस्त्रे देणार आहे.
रत्नागिरी, दोपोलीच्या कोकण किनारपट्टीवर ड्रग्सची पाकिटं सापडल्याने खळबळ; तपास यंत्रणांची झोप उडाली
सध्या कोकणच्या किनाऱ्यावर चरसची पाकिटं सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोकण किनारपट्टी भागात जागोजागी ड्रग्जची पाकिटे सापडली आहेत.
कोकण रेल्वेच्या गेटमनची गोळ्या झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना
कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या गेटमनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम
Rare Mushroom In Sindhudurg Forest: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्रात चमकणाऱ्या अळंबीची पहिली नोंद झाली आहे.
मॅरेज सर्टिफिकेट हवंय झाडं लावा, लगेच होईल काम; राज्यातील 'या' गावाने घेतला निर्णय
Marriage Certificate Rule: विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एका गावाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्र हवे असल्यास झाडे लावा, असं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे.
रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू; आयुष्यातील शेवटची पिकनिक ठरली
धबध्बयावर फिरायला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा या पावसाळी सहली जीवावर बेतू शकतात. रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे.
महाडच्या 'या' गावात जमिनीतून गूढ आवाज! गावकऱ्यांमध्ये दहशत, प्रशासनाकडून इशारा
Mysterious Underground Sounds In Raigad: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कसबे शिवथर या गावातून गूढ आवाज येत असल्याचे समोर आले आहे.
Monsoon Update : राज्यात पुन्हा एका धो धो, पुढच्या चार-पाच दिवसात 'कोसळधार
राज्यात गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण येत्या चार ते पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराता कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे.
चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा, वेळापत्रक पाहा
Running of Ganpati Special Trains: चाकरमान्यांना बाप्पा पावणार आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकणात स्पेशल गाड्या सोडणार आहेत. पाहा वेळापत्रक
इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले
इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.
रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती.
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या, तर जादा एसटी बस
Konkan Railway Special Train : यंदा श्रावण अधिक मास आल्यामुळे गणपतीचं आगमन उशिरा असले तरी चाकरमान्यांना कोकणात गौरी, गणपतीसाठी जाण्याचे वेध लागले आहेत. अशावेळी चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत म्हणून रेल्वे आणि एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे.