प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आरडीएक्स उतरवण्यात आल्याचं उघड झालं होते. आता पुन्हा एकदा कोकणचा किनारा चर्चेत आलाय. कोकणच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्सची पाकिटं सापडलीयेत. कोट्यवधींच्या या ड्रग्समुळे तपास यंत्रणांची झोप उडाली आहे.
कोकण किनारपट्टी भागात जागोजागी ड्रग्सची अनेक पाकिटं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. 14 ऑगस्टला दापोलीच्या कर्दे किना-यावर केतकीच्या बनात एका व्यक्तीला पोत्यात संशयास्पद वस्तू दिसून आल्या. पोलिसांनी हे पोतं तपासलं असता त्यात चरस आढळून आले होते. कर्दे किनरी असलेल्या केतकीच्या बनात मध्ये हे चरस पहिल्यांदा पोलिसांनी जप्त केलं प्रथमतः हे चरस कोणीतरी या ठिकाणी आणून ठेवलाय का या संदर्भात पोलिसांनी तपास केला. मात्र दापोलीच्या विविध किनाऱ्यावर अशाच पद्धतीचे पाकीट सापडायला सुरुवात झाली. त्यानंतर दापोलीच्या सर्वच किना-यांवर अशी ड्रग्सची पाकिटं सापडू लागली. या धक्कादायक प्रकारानं पोलीस विभागासह कस्टम विभागानं अलर्ट मोडवर आला आहे.
दापोली तालुक्यातल्या कर्डे, लाडघर, केळशी, कोलथरे, मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बो-या समुद्रकिना-यावरून पोलिसांनी ड्रग्सची पाकिटं जप्त केली आहेत.
आतापर्यंतच्या कारवाईत रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून कस्टम विभागानं तब्बल 222 किलो चरस जप्त केले आहे. तर, रत्नागिरी पोलिसांच्या हाती 37 किलो चरस लागलंय. या पाकिटांवर अफगाणिस्तानचा उल्लेख असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या किनारपट्टी भागातही अशाच प्रकारे चरसची पाकिटं सापडली होती. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. अशा पद्धतीच्या सापडलेल्या चरसच्या च्या पाकिटांवर अफगाणिस्तानचा उल्लेख असल्याचं बोललं जातंय दापोली तालुक्यातल्या करदे लाडघर केळशी कोळथरे मुरुड बुरोंडी दाभोळ या बंदरांवर तर गुहागर तालुक्यातल्या बोर्या बंदरावर अशा पद्धतीचे चरस सापडलेले आहेत ड्रग्समुळे रत्नागिरी पोलीस आणि कस्टम विभाग कामाला लागलंय. ड्रग्सची पाकिटं समुद्रातून वाहून आलीयेत की या भागात तस्करी सुरूंय याचा शोध घेतला जात आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर RDX उतरवण्यात आल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर आता ड्रग्सच्या पाकिटांमुळे कोकण किनारपट्टी पुन्हा एकदा संशयाच्या भोव-यात सापडलीय. एकाच वेळी विविध किनारपट्ट्यांवर अशी शेकडो पाकिटं सापडणं, यातून निसर्गरम्य कोकणचा उडता कोकण होतोय का? या बाजुनेही तपासणं होणं गरजेचं आहे.