कोरोना नंतर आता या खतरनाक वायरसचा कहर; या शहरांमध्ये वेगाने वाढताहेत रुग्ण

कोरोना वायरसनंतर आता झिका वायरसचा कहर जाणवत आहे. जीका वायरसने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीदेखील झिका वायरसबाबत गंभीर इशारा दिला आहे

Updated: Nov 7, 2021, 02:46 PM IST
कोरोना नंतर आता या खतरनाक वायरसचा कहर; या शहरांमध्ये वेगाने वाढताहेत रुग्ण title=

नवी दिल्ली :  कोरोना वायरसनंतर आता झिका वायरसचा कहर जाणवत आहे. जीका वायरसने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीदेखील झिका वायरसबाबत गंभीर इशारा दिला आहे. आरोग्य विभाग अलर्टवर आहे. एक्स्पर्टच्या मते, झिका वायरस संसर्गामध्ये मृत्यू दर कोरोना वायरसहून अधिक आहे. उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये झिका वायरसचा धोका अधिक वाढत आहे. मागील 24 तासात 13 नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या झिका वायरसची संख्या 79 इतकी झाली आहे. कनौजमध्ये देखील झिका वायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

देशात रुग्णांचे प्रमाण
गुजरातमध्ये वर्ष 2017 मध्ये 3 आणि 2018 मध्ये 1 रुग्ण आढळून आला होता. नंतर 2017 मध्ये तामिळनाडूमध्ये 1 प्रकरण समोर आले होते. वर्ष 2018 मध्ये मध्य प्रदेशमध्ये अचानक झिका वायरसचे रुग्ण वाढले आणि 132 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

2018 मध्येच राजस्थानात झिका वायरसचे प्रकरण समोर आले. 159 रुग्णांना संसर्गाचे निदान झाले. केरळमध्ये 2021 मध्ये झिका वायरसचे रुग्ण अचानक वाढले होते. या दरम्यान महाराष्ट्रात झिका वायरसचा एक रुग्ण आढळून आला होता. आता कानपूर आणि कनौज मिळून उत्तर प्रदेशात 80 रुग्णांचे निदान झाले आहे.

डेंग्युसारखे आहेत झिका वायरसची लक्षणं
पहिल्यांदा वर्ष 1947 साली झिका वायरसची ओळख झाली. युगांडाच्या झिका जंगलात संसर्ग आढळून आला होता. झिका जंगलाच्या नावावरून विषाणूचे नाव ठेवण्यात आले.

झिका वायरस डासाच्या माध्यमातून पसरतो. झीका वायरसचे लक्षणं डेंग्युसारखे असतात. परंतु झिका वायरस डेग्युपेक्षा अधिक घातक असतो. तीव्र ताप, शरीरावर वळ पडणे आणि सांधे दुखणे इत्यादी या संसर्गाची प्रमुख लक्षणे आहेत.