ZEEL Official Statement: भांडवली बाजार नियामक SEBI ने एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा आणि समूहातील कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेडचे (ZEEL) व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनीत गोयंका यांच्यासंबंधी आदेश जारी केल्यानंतर ZEEL चे चेअरमन यांनी अधिकृतपणे यावर भूमिका मांडली आहे. तसंच कंपनीने SEBI च्या आदेशाविरोधात SAT मध्ये अर्ज केला आहे. ZEEL चा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. गुरुवारी ZEEL च्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
याआधी ZEEL ने आपलं अधिकृत निवेदन जारी केलं आहे. कंपनीचे चेअरमन आर गोपालन यांनी सांगितलं आहे की, "झी एंटरटेनमेंटच्या बोर्डाने SEBI च्या अंतरिम आदेशाची दखल घेतली आहे. सध्या बोर्ड SEBI च्या आदेशाची पडताळणी करत आहे. याप्रकरणी कायदेशीर सल्लामसलत केली जात आहे".
आर गोपालन यांनी सांगितलं की, गुंतवणूकदारांच्या हिताचे सर्व योग्य निर्णय घेतले जातील. बोर्ड डॉ. सुभाष चंद्रा यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुक करतं. तसंच स्पष्ट करत आहे की, पुनीत गोयंका यांच्या नेतृत्वात कंपनीने चांगली कामगिरी केली आहे, तसंच व्यावसायात चांगली प्रगती झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कंपनी आपल्या सर्व भागधारकांना मूल्यवर्धानाचा लाभ मिळावा या दिशेने वाटचाल सुरु ठेवेल. बोर्डाला विश्वास आहे की, कंपनी भविष्यासाठी आखण्यात आलेली निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करणं सुरू ठेवेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करेल.
SEBI ने 12 जूनला अंतरिम आदेश दिला होता. या आदेशात सांगण्यात आलं होतं की, डॉ. सुभाष चंद्रा आणि ZEEL चे व्यवस्थापकीय संचालक गोयंका आता कोणत्याही लिस्टेड कंपनीतील संचालक किंवा इतर महत्त्वाचं पद आपल्याकडे ठेवू शकत नाही. SEBI च्या आदेशानंतर झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ZEEL चा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात 192.15 वर ट्रेडिंग करत आहे. यामध्ये 1.39 टक्क्यांची किंचित घट झाली आहे.