भांड्यावर पाय, डोक्यावर गॅस सिलिंडर आणि नटराज पोझ, चॅलेंज असा Video पाहिला नसेल

Viral Video : बापरे भांड्यावर पाय आणि डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन त्यात नटराज पोझ, हा भयानक स्टंटचा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल. 

नेहा चौधरी | Updated: Oct 4, 2023, 05:05 PM IST
भांड्यावर पाय, डोक्यावर गॅस सिलिंडर आणि नटराज पोझ, चॅलेंज असा Video पाहिला नसेल title=
woman gas cylinder on head and steel pot dances shocking video viral on Internet trending news

Viral Video : सोशल मीडियावर सेकंद सेकंदला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही इतके भयानक असतात की आपली झोप उडते. सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि लाइक्ससाठी अनेक जण जीवघेणा स्टंट करतानाचे व्हिडीओ बनवतात. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढण्यासाठी यूजर्स काहीही करतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. खरं तर या महिलेने खतरनाक पण भन्नाट डान्स केला आहे. या महिलेचा डान्स पाहून तुम्ही आश्चर्यचिकत व्हाल. (woman gas cylinder on head and steel pot dances shocking video viral on Internet trending news )

भांड्यावर पाय, डोक्यावर गॅस सिलिंडर आणि नटराज पोझ!

खरं तर जीवघेणे स्टंट करणारे यूजर्सला नेटकरी ट्रोल करतात. पण या महिलेचा स्टंटचा व्हिडीओ नेटकऱ्यांना पसंत पडतो आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला डोक्यावर जड असा गॅस सिलिंडर घेऊन नाचताना दिसतं आहे. त्याच्या समोर एक स्टीलचं भांड उलट जमिनीवर ठेवलं आहे. ती महिला डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन थोड्याच वेळात त्या भांड्यावर चढते आणि डान्स करायला लागते. एवढंच नाही तर काही वेळानंतर ती भांड्यावर गोल गोल फिरते आणि नटराजची पोझ देते. 

हा खतरनाक स्टंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @karagam_durga या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या महिलेने दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्यावर हा भयानक स्टंट केला आहे. हा थरारक व्हिडीओचा 23 सप्टेंबरला पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 17 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाला आहे. 

हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, हा डान्स आहे की स्टंट? तर एका यूजर्सने म्हटलं आहे की, ही महिला या कलेत कितीही प्रशिक्षित असली तरी हा प्रकार प्राणघातक आहे. त्याशिवाय हा व्हिडीओ पाहून कोणीही असा मूर्खपणा करु नका असं म्हटलं आहे. या स्टंटमधून जीवाला धोका आहे. तर दुसऱ्या यूजर्सने म्हटलं आहे की, असे व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकायला पाहिजे. असे जोखीम घेण्यास प्रोत्साहित करणं योग्य नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान सोशल मीडियावर रील बनवण्याच्या स्टंटबाजीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.