नवी दिल्ली : राजकीय हस्तक्षेपामुळे सीबीआय आपली जबाबदारी चोख पार पाडू शकत नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी अशी टीका केलीय. दिल्लीच्या विज्ञान भवनातील कार्यक्रमात ते बोलत होते. ज्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसतो त्या प्रकरणात सीबीआय चांगले काम करते. मात्र ज्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतो. त्यावेळी सीबीआय तेवढी चांगली कामगिरी दाखवू शकत नाही आणि न्यायालयात ते प्रकरण पाहिजे त्या क्षमतेने तडीस जाऊ शकत नाही, अशी खंत गोगोई यांनी यावेळी व्यक्त केली.
सीबीआयच्या कामात कुठे न कुठे राजकीय दबाव असल्याचं दिसून येतं. सीबीआयला कॅगसारखी स्वायत्तता मिळावयास हवी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. सीबीआयमध्ये १५ टक्के वरिष्ठ पदं, २८ टक्के तांत्रिक पदं आणि ५० टक्के कायदेशीर विभागात जागा रिकाम्या असल्यामुळे कामाचा ताण अधिकाऱ्यांवर असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सीबीआयमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी अनेकदा न्यायालयाकडून निर्देश देण्यात आलेत. त्याचअंतर्गत यूनियन ऑफ इंडिया विरुद्ध विनित नारायण प्रकरणात निकाल दिल्याचे रंजन गोगोईंनी सांगितले.