संसद भवनात उल्टे पंखे का लावण्यात आले आहेत?

संसेदत लावण्यात आलेले पंखे उल्टे का आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Updated: Jul 15, 2021, 09:51 PM IST
संसद भवनात उल्टे पंखे का लावण्यात आले आहेत? title=

नवी दिल्ली : जेव्हा संसद भवन बांधलं गेलं तेव्हा त्यावरील घुमट उंच बांधण्यात आला होता. घुमट उंच असल्यामुळे त्यावर सीलिंग फॅन लावणं अवघड होतं. लांब पाईप करुन पंखा लावण्याचा विचार केला गेला. पण ते शक्य झालं नाही. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये वेगळे खांब लावण्यात आले आणि त्यावर फॅन उल्टे लावण्यात आले. 

संसदेच्या प्रत्येक कोपऱ्यात यामुळे हवा व्यवस्थित पोहोचते. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये एसी लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण नंतर ऐतिहासिक गोष्ट म्हणून ते फॅन तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावर 144 खांब आहेत. प्रत्येक खांब्य़ाची उंची ही 25 फूट आहे. याचं डिजाईन परदेशी शिल्पकारांनी बनवलं होतं. संसद भवनचं बांधकाम भारतीय मजुरांनी केलं होतं.

भारताला सोन्याची खाण म्हटलं जायचं. भारताला 7 मुख्य नावांनी ओळखलं जातं. भारत, इंडिया, हिंदुस्तान, आर्यावर्त, जंबूद्वीप, भारतखंड, हिंद.