खुनी हत्तीण पोलिसांच्या अटकेत, अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलाचा हत्तीणीनं घेतला जीव, खुनी हत्तीणीसह पिल्लू पोलिसांकडून गजाआड

Updated: Jul 15, 2021, 09:03 PM IST
खुनी हत्तीण पोलिसांच्या अटकेत, अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई title=

आसाम: पोलिसांना गुन्हेगारांचा तपास करताना आपण कधी प्राण्याला अटक करू असं स्वप्नातही वाटलं नसेल. पण असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. एका हत्येचा आरोपाखाली हत्तीण आणि तिच्या पिल्लाला चक्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हत्तीणीच्या पिल्लालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

या हत्तीणीचा काय गुन्हा?

हत्तीणी आणि तिच्या पिल्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार या हत्तीणीवर अल्पवयीन मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सर्वजण चक्रावले आहेत.  आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील ही घटना समोर आली आहे. 

पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याबद्दल पाळीव हत्तीणीला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोकाखाटचे माजी आमदार जितेन गोगोई यांच्या मालकीचे असलेल्या दुलोमोनी नावाच्या हत्तीणीनं 8 जुलै रोजी नहारजन चहा इस्टेटजवळील बिजुली येथे मुलाची हत्या केली. 

या हत्तीणीविरोधात कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी वन अधिकाऱ्यांवर तीव्र दबाव आणला. त्यानुसार हत्तीण आणि तिच्या पिल्लाला अल्पवयीन मुलाच्या हत्ये प्रकरणी ताब्यात घेतलं. साखळदंड बांधून त्यांना वन अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अल्पवयीन मुलाने हत्तीच्या पिल्लाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिडलेल्या हत्तीणीनं त्याच्यावर हल्ला केला. आतापर्यंत अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे या हत्तीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली. 

Tags: