जेव्हा वाराणसीच्या रस्त्यांवर रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी

जेव्हा उशीरा रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी

Updated: Jul 15, 2018, 11:57 AM IST
जेव्हा वाराणसीच्या रस्त्यांवर रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मोठ्या सुरक्षा घेऱ्यामध्ये असतात. त्यांच्या सोबत मोठा ताफा असतो. पंतप्रधान मोदी जेव्हा ही बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यासोबत अनेक सुरक्षारक्षक असतात आणि संपूर्ण यंत्रणेला याची माहिती असते. पण शनिवारी रात्री मात्र काही वेगळं घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी रात्री वाराणसीमध्ये रात्री अचानक बाहेर पडले. पंतप्रधान मोदी सध्या 2 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. मोदींनी या दरम्यान काशी हिंदू विश्वविद्यालय (बीएचयू) मधील नव्या विश्वनाथ मंदिरामध्ये जावून दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते रवींद्रपुरी येथून सोनारपुरा, गोदौलिया, ज्ञानवापी मार्गे टाऊनहॉलला पोहोचले.

पंतप्रधानांनी केलं 'हेरिटेज वॉक'चं निरीक्षण

रंगीबिरंगी रोशनाई केलेल्या टाऊनहालच्या ऐतिहासिक भवनचं निरीक्षण करत पंतप्रधान लोहटिया येखून कबीरचौराला पोहोचले. मोदींनी पिपलानी कटरा तिराहे येथे संत कबीर यांच्या मूर्तिशिल्पाला भेट दिली. त्यानंतर‘हेरिटेज वॉक’चं निरीक्षण केलं. पंतप्रधान यानंतर लहुराबीर, तेलियाबाग मार्गे नदेसरमधील दूरदर्शन टॉवरला गेले. येथून ते डीजल रेल कारखान्यात पोहोचले.

उशीरा रात्रीपर्यंत वाराणसीत फिरत होते पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांचा हा रात्रदौरा सुरु असतांना त्यांच्या सोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मतदारसंघात अशाप्रकारे रात्रीच्या अंधारात लोकांमध्ये आले की आज सगळीकडे त्याच्या चर्चा आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, पहिल्यांदा कोणतातरी पंतप्रधान बनारसमध्ये रात्रीच्या वेळी विकासकामांचा आढावा घेत फिरत आहेत. पंतप्रधान मोदींनी उशिरा रात्री रस्त्याच्या बाजुला उभे असलेल्या लोकांचं अभिवादन देखील स्विकारलं. यानंतर पीएम मोदी डीरेका गेस्ट हाऊसमध्ये रात्री आराम करण्यासाठी पोहोचले. भाजपच्या सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी ते पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मिर्जापूरला जाणार आहेत.