बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी

10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर  टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत. 

Updated: Sep 20, 2023, 10:42 PM IST
बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे?  तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी title=

Titanic Ship Accident :  टायटॅनिकची कथा सगळ्यांनाच माहित आहे. युरोपातून अमेरिककडे निघालेलं हे जहाज पहिल्याच प्रवासात बुडालं. त्यानंतर तब्बल एक शतक टायटॅनिक सागरतळाशी विश्रांती घेतंय आहे. दुर्घटनाग्रस्त टायटॅनिकवरील वस्तू कशा मिळवायच्या यावर समुद्रशास्त्रज्ञ आणि तज्ञ अनेक वर्षांपासून वाद घालत आहेत. अशातच टायटॅनिक हा चित्रपट बनवणारे हॉलिवूड चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन  यांनी बुडालेल्या टायटानिकचे अवशेष पाहण्यासाठी तब्बल 33 वेळा समुद्राचा तळ गाठला आहे. बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना नेमकं काय पाहिजे?

बुडालेल्या टायटॅनिकची अनेक  रहस्य शोधण्याचा प्रयत्न 

1997 साली जेम्स कॅमेरॉन यांनी टायटॅनिक सिनेमा काढला. या चित्रपटात टायटानिकचा प्रवास दाखवण्यात आली आहे. हे जहाज किती भव्य आणि अलिशान होते हे दाखवण्याचा कॅमेरॉन यांना यशस्वी प्रयत्न केला. आजही प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. कॅमेरॉन यांनी टायटॅनिक बद्दलचे कुतूहल फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित ठेवले नाही तर ते आजही  बुडालेल्या टायटॅनिकची अनेक  रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

बुडालेल्या टायटॅनिक अवशेष पाहण्यासाठी तब्बल 33 वेळा  समुद्राचा तळ का गाठला?  

बुडालेल्या टायटॅनिक अवशेष पाहण्यासाठी जेम्स कॅमेरॉन  यांनी  1995 ते 2005 या कालावधीत तब्बल 33 वेळा समुद्राचा तळ गाठला आहे. टायटॅनिकच्या बो आणि  स्टर्नवाल्या भागात एक वायरलेस डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस पाहिजे असल्याचे कॅमेरॉन  यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. या वायरलेस डिव्हाईसचे नाव मॅरकोनी सेट (Marconi Set) असे आहे.  या  वायरलेस डिव्हाईसच्या मदतीनेच रेस्क्यू शिप कॅरपॅथियाला SOS सिग्नल पाठवण्यात आला होता. या डिव्हाईसमुळेच टाइटॅनिकची परफेक्ट लोकेशन समजली होती. यामुळे 700 लोकांचा जीव वाचला होता. मॅरकोनी सेट मिळवण्यासाठी अनेक सागरी शोध मोहिमा राबवल्या. मात्र, मॅरकोनी सेट दिसला पण तो बुडालेल्या जहाजातून काढता आलेला नाही. टायटॅनिक जहाच्या अवशेषाचे अस्तित्वही संपुष्टात येण्याआधी हा मॅरकोनी सेट कॅमेरॉन  यांना मिळवायचा आहे. मॅरकोनी सेट त्यांना संपूर्ण जगाला दाखवायचा आहे. 

बुडालेल्या टायटॅनिकच उरलंसुरलं अस्तित्वही संपुष्टात येतयं

बुडालेल्या टायटॅनिकच उरलंसुरलं अस्तित्वही संपुष्टात येत चालले आहे.  बुडालेल्या टायटॅनिकवर संशोदन करणाऱ्या अमेरिकन कंपनीने आतापर्यंत 5500 पेक्षा जास्त वस्तु समुद्रातून बाहेर काढल्या आहेत. 2001 सालापर्यंत टायटॅनिकचे अवशेष बऱ्यापैकी सुस्थितीत होते. 2005 नंतर याच्या अनेक भागाचे तुकडे झाले. आता याचे संपूर्ण अवशेषच मानशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 10 एप्रिल 1912 रोजी हे जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले.