Home Loan Insurance Advantages: घर विकत घेणं म्हणजे संपूर्ण आयुष्याची पुंजी लावावी लागते. घराच्या किंमती आणि महिनाकाठी मिळणार पगार याचं गणित बसणं कठीण आहे. त्यामुळे एकरकमी घरं घेणं म्हणजे स्वप्नच म्हणावे लागेल. परंतु स्वप्नपुर्ती करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होम लोन घेतलं जातं. त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली घराचं स्वप्न पूर्ण होतं. पण कर्जाचे हफ्ते भरताना चांगलीच दमछाक होते. घरातील कर्त्या व्यक्तीचा या दरम्यान मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कुटुंबीयांची असते. जर कुटुंबीय कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास घरं गमवण्याची वेळ येते. म्हणजेच वित्तीय संस्था किंवा बँका कर्जाची परतफेड करण्यासाठी घराचा लिलाव करतात आणि कर्जाची रक्कम वसूल करतात. पण अशा परिस्थितीत होम लोन इंश्युरन्स कामी येतं. संकटकाळात कुटुंबीयाना आधार मिळतो. कसं ते जाणून घ्या.
होम लोन इंश्युरन्स कर्जाच्या रक्कमेसाठी सुरक्षा प्रदान करते. बँकेकडून लोन घेतल्यानंतर होम लोन इंश्युरन्स ऑफर केलं जातं. जर लोन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची रक्कम या इंश्युरन्सच्या माध्यमातून भरली जाते. म्हणजेच कुटुंबीयांवर मृत्यूनंतर कोणताच दबाव येत नाही. तसेच होम देणाऱ्या बँक त्या घरावर आपला अधिकार बजावत नाहीत.
होम लोन इंश्युरन्स घेणं अनिवार्य नाही. मात्र होम लोन इंश्युरन्स घेणं गरजेचं आहे. आरबीआयनं होम लोन इंश्युरन्सबाबत कोणतीही गाइडलाइन जारी केलेली नाही. मात्र असं असलं तरी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी होम लोन इंश्युरन्स गरजेचं आहे. काही बँका होम लोन इंश्युरन्स घेणं अनिवार्य असल्याचं सांगतात. पण तसा नियम कुठेच नाही. त्यामुळे होम लोन इंश्युरन्स घ्यायचं की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
होम लोन इंश्युरन्सची प्रीमियम एकूण कर्जाच्या राशीच्या 2 ते 3 टक्के असते. लोन घेताना तुम्ही एकरकमी भरू शकता किंवा ही रक्कम ईएमआयने भरू शकता. म्हणजेच होम लोनचा हफ्तासारखा होम इंश्युरन्सचा ईएमआयही भरला जाईल. या इंश्युरन्सचा ईएमआय त्या तुलनेत फारच कमी असतो.
बातमी वाचा- Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
काही विशिष्ट स्थितींमध्ये होम लोन इंश्युरन्सचा लाभ घेता येत नाही. होम लोन कोणाच्या नावावर शिफ्ट करताना किंवा वेळेआधी बंद केल्यास इंश्युरन्स मिळत नाही. पण लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता, प्री-पेमेंट किंवा रिस्ट्रक्चर करता तेव्हा काहीही फरक पडत नाही. त्याचबरोबर आत्महत्याही होम लोन प्रोटेक्शनच्या अंतर्गत येत नाही.