खबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा?

अनेकजण निमंत्रण नसताना लग्नसमारंभात सहभागी होतात आणि फुकटच्या जेवणावर ताव मारतात. मात्र, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागू शकते.  

Updated: Feb 14, 2024, 04:11 PM IST
खबरदार! लग्नात फुकट जेवाल तर तुरुंगात जाल, नेमका काय आहे कायदा? title=

Wedding:  आमीर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन हे करीना कपूरच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात घुसतात. लग्नातील फुकटच्या जेवणावर ते येतेच्छ ताव मारतात. मात्र, हे लग्न त्यांच्या कॉलेजचे प्रिंसीपल बोमन इराणी यांच्या मुलीचे असते हे त्यांना माहित नसते. त्यांना जेव्हा हे कळते तेव्हा जो काही ड्राम होतो तो पाहण्यासारखाच आहे. थ्री इडियट्स या चित्रपटातील हा ऑयकॉनिक सीन सगळ्यांच्याच लक्षात आहे. मात्र, चित्रपटाच्या या सीन प्रमाणे तुम्ही अनोळकी लोकांच्या लग्नात घुसून फुकटचे जेवण जेवण्याचा प्रयत्न केला तर दोन वर्ष जेलची हवा खावी लागू शकते. कारण, अशा प्रकारे लग्नात फुकटचे जेवण फस्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. 

15 जानेवारीलाच खरमास संपला आहे. आता शुभ कार्यासह लग्नसमारंभाला सुरुवात झाली आहे. अनेकजण मोठ्या थाटामाटात लग्न करतात. लग्नात जेवणाचे असंख्य मेन्यू असतात. अनेकजण लग्नात जेवणावरच जास्त खर्च करतात. मात्र, काही फुकट्या लोकांमुळे लग्नसोहळ्यातूल जेवणाचे बजेट अचानक वाढते. यामुळे अनेकांना अर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. 

लग्न सोहळ्यात आयोजक पाहुण्यांची यादी बनवून त्यानुसारच जेवणाची ऑर्डर देतात. मात्र, अनेकांना अचानक जेवणाऱ्यांची वाढल्याने जादा पैसे भरावे लागतील असे कॅटरर्सवाल्यांकडून सांगण्यात येते. यामुळे ऐनवळी जेवणाच्या ऑर्डरसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे मोजावे लागतात. लग्नात येणाऱ्या बिनबुलाये पाहुण्यांमुळे अचानक जादा पैसे मोजावे लागतात. अनेकदा हॉस्टेलमध्ये राहणारे तरुण, विद्यार्थी तसेच ज्या ठिकाणी लग्नसोहळा सुरु आहे तिथे आसपास राहणारे लोक कोणतेही आमंत्रण नसताना लग्नसोहळ्यात सहभागी होतात. 

लग्नात फुकटचे जेवण जेवणाऱ्यांना 'या' काद्याअंतर्गत होतो जेल

लग्नात फुकटचे जेवण जेवणाऱ्यांवर कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई होते याबाबत वकिल उज्वल त्यागी यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे.  उज्वल त्यागी यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अब बिन बुलाये मत जाना शादी में... Share with your friends jinke sath aapne bhi bina bulaye shadi attend ki hai असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.  लग्नसमारंभात न बोलवता जाणं हा ट्रेसपासिंगचा प्रकार आहे. आमंत्रण नसताना लग्नात घुसणाऱ्यांवर भारतीय दंड सहित कलम 442 आणि 452 अंतर्गत कारवाई होते. या कलमाअंतर्गत संबधीत व्यक्तीला दोन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.  कलम 442 आणि 452 अंतर्गत घुसखोरी केल्या प्रकरणी कारवाई केली जाते. उज्वल त्यागी यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या या माहितीवर अनेक कमेंट्स येत आहेत.