Viral video : या हत्तीने रेखाटलं स्वतःचं चित्र, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज काही ना काही मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Updated: Jul 15, 2021, 10:32 PM IST
Viral video : या हत्तीने रेखाटलं स्वतःचं चित्र, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सध्या एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही तो गंमतीशीर वाटेल कारण, त्यामध्ये हा हत्ती चित्र काढत आहे. तुम्ही कदाचित कधीच हत्तीला चित्र काढताना पाहिले नसणार. त्यात त्याने इतकं सुंद चित्र पाहिलं आहे की जो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, तो एका प्राण्याने काढला आहे.

या व्हिडीओमधील हत्ती हा चार वर्षाचा आहे त्याचे नाव सुदा आहे. हा हत्ती कॅनव्हास बोर्डावर स्वत:चा पोर्ट्रेट चित्रीत काढताना दिसतोय. काही मिनिंटाच्या व्हिडीओमध्ये हत्ती पहिले सोंड काढतो आणि नंतर तो शरीराचा संपूर्ण भाग काढतो. त्यानंतर तो पाय काढण्यासाठी दोन समांतर रेषा रेखाटतो.

असे करत तो संपूर्ण पेंटींग पूर्ण करतो. हा हत्ती पेंटींग करत असताना त्यात संपूर्ण बुडाला आहे. हा पेंटींगमध्ये हा हत्ती शेवटी गुलाबाचे काही फुलं काढतो आणि स्वता:ची सही करुन हे पेंटींग पूर्ण करतो.

ट्वीटरवर एका यूझरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की "हत्ती खूप स्मार्ट असतात" आणि ते खरे देखील आहे. कारण या हत्तीने आपल्या चित्रातून ते सिद्ध केलं आहे.

29 जून रोजी हा व्हिडीओ सामायिक केल्यापासून, त्याला अनेकदा पाहिले गेले आहे. ऐवढेच काय तर, या व्हिडीओला अनेक लोकांकडून शेअर देखील केलं गेलं आहे. अनेक लोकंनी या हत्ती आणि त्याच्य कलेचे कौतुक केले आहे.