Snake Viral Video: आपल्या अवतीभोवती असे बरेच प्राणी आहेत. त्यात अनेक प्रकारही आहेत. कधी ते आपल्या परिचयाचे असतात तर ते कधी आपल्या परिचयाचे नसतात. त्यातून सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही आपल्या या भूतलावर मोठी आहे. कधी कधी आपल्याला अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाची गुपितंही समजून येत नाहीत. त्यांच्यामागेही अनेक रहस्यही दडलेली असतात. सोशल मीडियावर (Viral Videos on Social Media) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही कदाचित कोड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. अशाच पद्धतीचा प्राणी ना तुम्ही कधी पाहिला असेल ना असा प्राणी या भुतलावर आहे याचा अंदाजही लावला नसेल.
सध्या हा व्हायरल व्हिडीओ (Viral Videos) पाहून तुम्हीही हेच म्हणाल की साप आहे की गवत की आणखी काही? अलियन तर नाही ना? पण काळजी करू नका हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचीही नक्कीच खात्री पटेल हा प्राणी नक्की आहे तरी कुठला?
आपल्या निसर्गात तशी अनेक रहस्य असतात त्यामुळे आपणही गोंधळात पडतो. आपल्यालाही कळत नाही की हे प्राणी नक्की सरपटणारे (Snake Video) आहे की आणखी काही. व्हिडीओत तुम्हाला एक साप दिसेल. या व्हिडीओतला साप हा कुठला रहस्यमय साप आहे की काय असं मानलं जात आहे. त्याचा रंगही अगदी गवतासारखा हिरवा आहे. त्यामुळे हिरव्या रानात लपल्यामुळे आपल्याला पटकन कळून येत नाहीये की हा साप गवतचं आहे की हिरव्या रंगाचा सरपटणारा प्राणी? (What are Snakes Types)
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
सध्या या व्हिडीओवर नानातऱ्हेचे कमेंटस लोकं करत आहेत. कोणी हा साप परग्रहातून आला आहे असं म्हटलं जात आहे तर काहींना हा नक्की कुठला तरी (Mystrious Animal) वेगळा प्राणी पृथ्वीवर आला आहे असं म्हटलं जात. हा व्हिडीओ अनेकांनी शेअरही केला आहे. काही लोकं हा व्हिडीओ प्रत्यक्ष पाहण्याची हिंमत करत आहेत, तर काहींना हा व्हिडीओ पाहतानाही त्रास होतो आहे.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
हा साप कितपत विषारी आहे? याची पडताळणी करणे आवश्यक आहे, असेही मत अनेकांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर (Instagram Viral Video) मांडले आहे. सोशल मीडियातील या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रहस्यमय सापाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला आहे. सापाची नेमकी दहशत काय असते? त्याचे विविध रूप कसे असते? तो कशाप्रकारे दंश करतो? अशा विविध प्रश्नांची उत्तरे लोकांना सापाच्या व्हिडिओमधून मिळत असतात.
रहस्यमय सापाचा व्हायरल व्हिडिओ हा थायलंडमधील (Thailand) असल्याचे उघडकीस आले आहे. पूर्वोत्तर थायलंडमध्ये हा साप दिसला आहे. तेथील स्थानिक संशोधक या सापाच्या हालचाली तसेच इतर बाबींचा अभ्यास करत आहेत. एका घराशेजारील पाणथळ जागेवरती हा रहस्यमय साप दिसला आहे. हा साप सध्या एका जारमध्ये ठेवण्यात आला आहे. साप जवळपास दोन फूट लांब असून या सापाला खाद्य म्हणून मच्छी खायला घातले गेले आहे.