मुंबई : सोशल मीडियाच्या जगात आपल्या असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला थक्कं करतात. येथे असे वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. येथे रातोरात एखादा व्हिडीओ असा काही व्हायरल होतो की, बस रे बस. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच आहे. या व्हिडीओला पाहून तुम्हाला धक्काच बसेल आणि तुम्ही तुमचा श्वास रोखून धराल.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ जंगलातील आहे. जंगल सफारीला गेलेल्या लोकांसमोर सिंह येतो. जो आपल्या थाटात चालत असतो. त्यावेळेला तेथे एक व्यक्ती सिंहाला पाहून फक्त गाडीवर बसून राहातो. हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवेल. कारण हा सिंह या व्यक्तीच्या इतक्या जवळून जातो की, तुम्हाला वाटेल आता या माणसाची शिकार होण निश्चित आहे किंवा सिंह याला हानी पोहोचवल्याशिवाय राहाणार नाही.
परंतु हा सिंह त्या व्यक्तीला काहीच न करता तेथून निघून जातो. आता हे दृश्य पाहून तुमच्या मनात हा प्रश्न पडलाच असेल की, असं कसं घडलं? सिंहाने या व्यक्तीला काहीच का केले नाही?
तर हे लक्षात घ्या की, सिंह विनाकारण हल्ला करत नाहीत. जे तुम्हाला या व्हिडीओत दिसलंच आहे. हा व्यक्ती एकदम दगडा सारखा शांत होऊन कोणतीही हालचाल न करता बसून राहातो, ज्यामुळे सिंह त्याच्यावरती हल्ला करत नाही आणि तेथून निघून जातो.
हा व्हिडीओ कधी काढण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण हे भयानक दृश्य आफ्रिकेच्या साबी रिझर्व्हचे सांगितले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही जंगल सफारीला गेलेले लोक त्यांच्या गाडीवर बसलेले दिसत आहेत. कच्चा रस्ता आहे जिथे दोन वाहने समोरासमोर उभी असतात. तेवढ्यात एक सिंह त्यांच्या वाहनाच्या मधून फिरत असतो आणि गाडीच्या बोनेटवर बसलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळ येतो. सिंहाला पाहून या माणसाच्या चेहऱ्याचा रंग उडालं असल्याचं तुम्ही पाहू शकता.
सिंह जवळ येताच गाडीवर बसलेली व्यक्ती श्वास पूर्णपणे रोखून दगड बनते आणि अजिबात हलत नाही. त्या व्यक्तीला असे पाहून सिंहही सरळ आपल्या मार्गाने निघून जातो.
हा थरारक व्हिडीओ इंस्टाग्रामवर richard.degouveia नावाच्या पेजने शेअर केला होता आणि कॅप्शन लिहिले होते - 'तुम्हाला ट्रॅकर्स सीट (वाहनाच्या समोरील खुर्ची) कशी वाटेल? त्यांनी पुढे लिहिले - सबी सबी राखीव प्राण्यांना पिढ्यानपिढ्या सवय आहे की ते त्यांच्या आजूबाजूच्या वाहनांच्या उपस्थितीकडे लक्ष देत नाहीत.
तसे पाहाता दरवेळेला सिंह किंवा जंगली प्राणी समोर आल्यावर तो तुमच्यावर हल्ला करणार नाही हे नाकारता येत नाही. जंगली प्राण्यांचा तुम्ही काहीही भरोसा देऊ शकत नाही. या सिंहाला भूक लागली नसावी, तसेच त्याला गाडीतील अशा लोकांची सवय असावी म्हणून त्याने काही केलं नाही.
परंतु तुम्ही जर अशा प्रसंगात अडकलात, तर या पर्यायाचा वापर करु पाहू शकता परंतु याची ग्वाही देणं कठीण आहे की जंगली प्राणी काहीच करनार नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की उगाच विषयाची परीक्षा घेऊ नका. शक्य तितकं अशा भागात राहाणं टाळा.