चालती ट्रेन पकडण्यासाठी महिला धावली, पाय घसरला आणि... काय घडलं पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ट्रेनशी संबंधीत आहे.

Updated: Feb 17, 2022, 08:46 PM IST
चालती ट्रेन पकडण्यासाठी महिला धावली, पाय घसरला आणि... काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : अपघात कोणाला विचारुन येत नाही असं म्हणतात. कुठे काय होईल हे देखील कोणाला सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही असाल, तरी परिस्तितीच भान राखा. आपला जीव हा फार महत्वाचा आहे आणि त्याला जपा. सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपले मनोरंजन तर करतात, परंतु आपल्याला बरंच काही उदाहरणं देखील देतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो ट्रेनशी संबंधीत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला अती घाईमुळे अशी चुक करुन बसते, ज्याची शिक्षा तिला, तिचे प्राण देऊन मोजावी लागू शकत होती. परंतु तिचे नशीब चांगले असल्यामुळे तिचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, लोक खूप तणावा खाली राहतात आणि त्यांना लवकरात लवकर ऑफिस किंवा घरी पोहोचायचे असते. पण थोडी घाई त्याच्या जीवावर बेतु शकते. असेच काहीसे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी महिला कसा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. बोगीच्या बाजूला पकडून ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असते. पण नंतर तिचा पाय घसरतो आणि ती तिथेच पडते. तेव्हाच तेथील आरपीएफ जवान वेळीच तेथे येऊन त्या महिलेला पकडलं आणि त्याने परिस्थिती सांभाळली अन्यथा खूप मोठा अपघात झाला असत.

या जवानाने जी तत्परका दाखवली आहे, त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. तसेच लोकांना काळजी घेण्याचे देखील त्यांनी आवाहन केलं आहे.