Viral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर

Accident Viral Video :  एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.  

सौरभ तळेकर | Updated: Nov 21, 2023, 07:40 PM IST
Viral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर title=
Viral Video of Auto Rickshaw Acciden

Trending Auto Rickshaw Viral Video : भारतात दररोज रस्ते अपघातांचे (Accident Viral Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात असे असतात की जे पाहून अंगावर काटा येतो. या अपघाताला पाहून अनेकांना भयानक स्वप्न देखील पडतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. भरधाव पळणारी रिक्षा अचानक (Auto Jumped Into Air) कशी उडाली? असा सवाल देखील तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. 

कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. एका रस्त्यावर नेहमी प्रमाणे वर्दळ असते. त्यावेळी अनेकजण आपापल्या कामावर जात असतात. काही दुचाकीवर वर तर काही जण आपल्या कारमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. त्याचबरोबर काहीजण रिक्षाने प्रवास करताना दिसत आहेत. त्याचवेळी एक भनायक घटना घडली. एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.

असा अपघात तुम्ही कधी स्वप्नातही पाहिला नसेल, असं दृष्य पहायला मिळालं आहे. पळता पळता रिक्षा अचानक हवेत उडाली अन् रिक्षाची पाठीमागची दोन्ही चाकं तुटून खाली पडली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. लोकांनी धाव घेतली अन् रिक्षातील जखमींना बाहेर काढलं. त्याचबरोबर त्यांच्यावर उपचार देखील केले गेले आहेत.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tausif Ahmad (@tausifahmad0)

नेमकं कारण काय? 

रिक्षाचा हा अपघात का झाला? यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण रिक्षाच्या इंजिनमध्ये काहीतरी बिघाड होऊन स्फोट झाला असेल अशी शंका उपस्थित केली जातीये. मात्र, काहींचं असं म्हणणं आहे की, भरधाव रिक्षाचा रिव्हर्स घेर पडला असावा, रिक्षाची चाकं उडून पडली ती रिक्षाचा रिव्हर्समुळेच.. असं काहींनी म्हटलं आहे.