मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. तसेच लहान मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अधिक पसंतीला पडतात. लहान मुलं हा प्रत्येकालाच आवडतात. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लहान मुलांना क्रूरपणे वागणूक दिली जात आहे. या मुलांना एक बाई इतक्या क्रूरपणे मारत आहे की त्या मुलांच रडणं तुमच्या मनाला हेलावून टाकेल.
हा व्हिडिओ नक्की कोणाचा आहे? याबद्दल अद्याप समोर आलेली नाही. तसेच हा व्हिडिओ कुणी व्हायरल केलाय हे देखील कळत नाही. पण या व्हिडिओवर सध्या खूप संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या व्हिडिओत एक व्यक्ती लहान मुलांना बेदम मारहाण करत आहे. या व्हिडिओतील त्या लहान मुलांना बोलताही येत नाही. पण त्यांच्यावर अत्यंत वाईट गोष्टींचा संस्कार होत आहे. या मुलांच्या डोक्यात मारलं जात आहे. तसेच त्यांच्या कानाखाली मारलं जात आहे. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की हे बघून तुम्हाला देखील चिड येईल. व्हिडिओच्या अगदी शेवटी तर लहान मुलाला चक्क मान आवळून त्रास दिला जात आहे.
हा व्हिडिओची झी चोवीस तास कोणतीही पुष्टी करत नाही. पण अशी क्रूर माणसं या जगात आहेत. आणि ते लहान मुलांशी असे वागत असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला माहित आहे या अगोदरही अनेक पाळणाघरातील व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना इतरांच्या हातात सोपवताना जरा सांभाळून.