Viral Video : सोशल मीडियाचा युवा पिढीवर प्रचंड प्रभाव आहे. अनेक तरुण-तरुणी प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर छोटे-छोटे Reel बनवत असतात. सोशल मीडियाच्या आभासी जगात Likes मिळवण्यासाठी युवा वर्गात चढाओढ सुरु असते. यासाटी काहीही करायची त्यांची तयारी असते. काही वेळा तर जीवाचीही पर्वा करत नाहीत.
सोशल मीडियावर Like मिळवण्यासाठी केलेला असाच एक प्रयोग एका तरुणाच्या जीवावर बेतला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) होशंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी गेलेल्या एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. हा तरुण रेल्वे ट्रॅकजवळ उभा राहून व्हिडिओ बनवत होता. तरुणाच्या मृत्यूचा हा थरार कॅमेरात कैद झाला आहे.
नेमकी घटना काय?
होशंगाबाद (Hoshangabad) जिल्ह्यातील पांजरा गावात रहाणारा संजू चौरे हा तरुण आपल्या दोन मित्रांसह पिकनिकला गेला होता. तिघे मित्र इटारसी इथे पिकनिकला गेले होते. जंगलात फिरताना त्यांनी Reels बनवायचं ठरवलं. यासाठी तिघांनी विचार करुन थीमही तयार केली. ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनच्या बाजूने चालत आपला स्वॅग दाखावयचा असा Video बनवायचं त्यांनी ठरवलं. वेगाने येणाऱ्या ट्रेनला हुलकाणी देण्याचा व्हिडिओ बनवायचं ठरलं.
रिल्समुळे रियल लाईफ धोक्यात घालू नका. रिल्सच्या नादात ट्रेनने दिली धडक#viralvideo pic.twitter.com/RdJqALIAat
— VISHAL SAVANE (@VISHALSAVANE) September 20, 2022
ठरल्याप्रमाणे संजू रेल्वे लगत उभा राहिला, मागून भरधाव वेगाने ट्रेन आली. पण संजूचा ट्रॅकच्या बाजूने चालत होता. पण संजूचा अंदाज चुकला आणि भरधाव वेगाने आलेल्या ट्रेनने संजूला धडक दिली. संजूच्या डोक्याला जोरदार फटका बसला. संजूच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेलं पण त्याधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.