Saif Ali Khan Attack : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 15 जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूनं हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. एका अज्ञात व्यक्तीनं त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ल्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेत सैफवर 6 वार झाले. सैफला रात्री लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आणि 16 जानेवारी रोजी सकाळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वृत्तानुसार, सैफच्या मणक्यातही चाकूने वार करण्यात आला होता. यानंतर सैफ आली खान आणि जखमी महिला कर्मचारी यांना रिक्षाने लीलावती रुगणालयात उपचारासाठी भरती केले. वांद्रे पोलिसांना याची माहिती मिळतात पोलीस सैफ अली खानच्या घरी रवाना झाले. त्यामुळे या हल्ल्याप्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. या सगळ्या प्रकरणात पोलिस चौकशी करताना दिसत आहेत.
सैफ अली खानच्या घराच्या फ्लोअरचे पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस चौकशी करतायत. पोलिस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, सैफवर हल्ला करणारा आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती का? त्याने 11 व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला. जिथे सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह राहतो. इतर फ्लोअरवर न शिरता आरोपी थेट 11 व्या माळ्यावरच कसा शिरला, यावरून त्याला इमारतीतील प्रत्येक गोष्टीची माहिती होती का? असाही प्रश्न उपस्थित करत फ्लोअरिंग पॉलिशिंगसाठी आलेल्या व्यक्तींशी आरोपीचा काही संबध आहे का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला शेवटचे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पळताना तो सीसीटिव्हीत चित्रीत झाला. त्यामुळे या हल्यात इतर कोण आरोपी सहभागी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून अद्याप तो आयसीयू मध्येच आहे. थोड्याच वेळात त्याच्या प्रकृती विषयी माहिती देण्यात येईल. आज क्राईम ब्रँचची टीम सैफचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची प्रकृती बघूनच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती.