सोशल मीडियाचा काळ आहे, काही ना काही गोष्टी व्हायरल होत आहे. आता सोशल मीडियावर अशीच एक नोट व्हायरल होत आहे. ज्यामागचं कारण आहे त्या नोटेवर लिहिलेला मजकुर. हा मजकुर म्हणजे एक प्रकारची प्रार्थनाच. सामान्यपणे लोक देवाकडे गेल्यावर सगळ्यांना सुखरुप ठेवण्याची मागणी करतात. पण या नोटेवर तर चक्क.....
कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका मंदिरातील ही नोट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अफजलपुर तालुक्याचीस कटाडारगी क्षेत्रात भाग्यवंती देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील दानपेटीमध्ये एक नोट मिळाली आहे. यामध्ये एका व्यक्तीने चक्क सासूच्या निधनाची प्रार्थना केली आहे. मंदिरातील लोक या नोटेवरील मजकुर पाहून हैराण आहे.
हा प्रकार भाग्यवंती देवी मंदिरात घडला आहे. जिथे दानपेटी उघडल्यावर हा प्रकार लक्षात आला. एका 20 रुपयांच्या नोटेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्या चिठ्ठीवर लिहिले होते: "आई, माझ्या सासूबाई लवकर मरण पावोत." सहसा जेव्हा मंदिराची दानपेटी उघडली जाते तेव्हा लक्ष रोख रक्कम किंवा मौल्यवान भेटवस्तूंवर असते, परंतु यावेळी 20 रुपयांच्या नोटेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि या इच्छेने मंदिर व्यवस्थापनाला धक्का बसला आणि ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानपेटीत एकूण 60 लाख रुपये रोख, 1 किलो चांदी आणि 200 तोळे सोन्याचे दागिने सापडले, परंतु या सर्वांमध्ये 20 रुपयांच्या नोटेवर लिहिलेल्या प्रार्थनेची सर्वाधिक चर्चा झाली. ही विचित्र घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लोकांनी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, जसे की पवित्र ठिकाणीही भावना इतक्या कठोर कशा असू शकतात.