SBI खातेदारांसाठी मोठी बातमी! थेट तुमच्या Saving वर परिणाम

 एसबीआयने आणखी एकदा सीनियर सिटीझनसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमचा कालावधी वाढवला आहे.

Updated: Sep 20, 2022, 01:55 PM IST
SBI खातेदारांसाठी मोठी बातमी! थेट तुमच्या Saving वर परिणाम title=

State Bank of India: देशातली सर्वात लोकप्रिय असणारी सर्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे तुम्ही खातेदार असाल आणि तुम्ही सिनियर सिटीझन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) सिनियर सिटीझनला (Senior Citizen) फिक्स्ड डिपॉजिटवर (FD) जास्तीचा रिटर्न दिला जातोय. एसबीआयने आणखी एकदा सीनियर सिटीझनसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमचा कालावधी वाढवला आहे.

बँकेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे कालावधीत वाढ

सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वात मोठी लेंडर बँक अशी ओळख असलेल्या एसबीआयने (SBI) जेष्ठ्य नागरिकांसाठीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट प्लान 'SBI Wecare' चा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. एसबीआयकडून (State Bank of India) याची सुरुवात 2020 च्या सप्टेंबर महिन्यात सुरु झाली होती. या प्लानला सिनियर सिटीझनकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने बँकेने या प्लानचा कालावधी वाढवला आहे.

30 बेसिस पॉईंट्सचं अतिरिक्त व्याज

सिनियर सिटीझनसाठी सुरु असलेल्या स्पेशल एफडी स्कीम 'SBI Wecare' मध्ये पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्तीच्या एफडीवर 30 बेसिस पॉईंट्सचं अतिरिक्त व्याज मिळतं. बँकेकडून पाच वर्षांच्या एफडी केल्याने 5.65 टक्क्यांच व्याज दिलं जातं. असं असलं तरी, स्पेशल स्कीमनुसार ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी एफडी करण्यावर 6.45 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातं.

एसबीआयचा एफडी रेट (SBI Fixed Deposits Rate)

एसबीआयकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर व्याजदराला 15 बेसिस पॉईंट्स वाढवला गेला आहे. या प्लानचे वाढलेले दर 13 ऑगस्टपासून लागू केले आहेत. एसबीआयच्या सामान्य नागरिकांना एफडीवर 2.90 टक्क्यांपासून ते 5.65 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जाणार आहे. सिनियर सिटीझनसाठी केलेल्या एफडीवर बँकेकडून 3.40 टक्क्यांपासून ते 6.45 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातं.