नखरेल नववधूला राग अनावर; भर मंडपात नवरदेवची नाटकं पाहूण तिने काय केलं पाहा व्हिडीओ

या वधूचा स्वॅग पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले

Updated: Nov 11, 2021, 02:22 PM IST
नखरेल नववधूला राग अनावर; भर मंडपात नवरदेवची नाटकं पाहूण तिने काय केलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : लग्नाशी संबंधित व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर तुम्हाला नेहमी वेगवेगळे कंटेन्ट पाहायला मिळतात. सोशल मीडियावरील हे व्हिडीओ लोकांचे नेहमीच मनोरंजन करत असतात. असाच एका लग्नामधील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू येईल. कधी वधू वर आपल्या धमाल नृत्याने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात, तर कधी त्यांचे गोंडस क्षण व्हायरल होत असतात.

परंतु या वेळेचा हा व्हिडीओ थोडा वेगळा आहे. या वधूचा स्वॅग पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरेतर, वधूला वराच्या नाटकांचा इतका राग आला की, तिने त्याला रसगुला न भरवता रागाने फेकून दिला.

इंटरनेटवर तुम्ही लग्नाचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये वधू आणि वर एकमेकांसोबत गंमत करतात किंवा त्यांच्या त्या क्षणांचा खूप आनंतर घेतात. लोकांना हा क्षण खूपच गोंडस वाटतो. पण या व्हिडीओमधील हे प्रकरण वेगळेच आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपात वधू नवरदेवाला मिठाई भरवत असते. परंतु नवरदेव तो खायला पटकन पुढे येत नाही ज्यामुळे नववधूला राग येतो आणि ती सरळ तिच्या हातातील रसगुल्ला फेकून देते.

नववधूकडून कोणालाही अशी अपेक्षा नव्हती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रागाच्या भरात रसगुल्ला फेकल्यानंतर वधू मागे हटते आणि नंतर खुर्चीवर हात पुसून तेथे बसण्याचा प्रयत्न करते. खरेतर नववधूला नवरदेवाची नाटकं आणि भाव खाणं आवडले नसावे ज्यासाठी ती इतकी रागवली असावी.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संतप्त नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. नववधूचा हा स्वॅग पाहून प्रत्येकजण थक्क झाले आहेत. या व्हिडीओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. मात्र, नववधूच्या या कृतीवर अनेकजण प्रतिक्रियाही देत​आहेत. त्याच वेळी, अनेक लोक म्हणतात की वराने देखील असी नाटकं करायला नको हवी होती.