Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video

Viral Richshaw Tyre Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल (Viral Video) मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की एका रिक्षावाल्यानं चक्क भर रस्त्यातच टायर बदलला आहे.

गायत्री हसबनीस | Updated: May 1, 2023, 06:07 PM IST
Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video title=
प्रतिनिधीक फोटो - झी न्यूज

Viral Richshaw Video: हल्ली नानातऱ्हेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून रिक्षाशी संबंधित व्हिडीओ तर (Viral VIDEO) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रिक्षा ड्रायव्हर आपल्या गाडीचं चाक भर रस्त्याच बदलताना दिसतो आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे.

या व्हिडीओत या माणसाची शक्कल पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याचे तूफान कौतुक केले आहे. तर काहींनी ट्रोलही (Trolled) केले आहे. परंतु हा व्हिडीओ पाहून तुमचेही मनोरंजन झाल्याशिवाय राहणार नाही या व्यक्ती काही मिनिटांत... नव्हे काही सेकंदातच आपल्या रिक्षाचे टायर बदलले. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ फारच चर्चेत आहे. 

रिक्षाचा टायर पंक्चर झाला तर आपल्यालाही तो रिक्षा थांबवून बदलावा लागतोच. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक रिक्षावाला चक्क भर रस्त्यात एका दुसऱ्या रिक्षाचालकाच्या मदतीनं टायर बदलताना दिसतो आहे. या चालकाला इतकी घाई होती की त्याला चक्क रिक्षा थांबवायलाही वेळ नव्हता. त्यानं भरधाव वेगानं (Rickshaw Tyre Video) रिक्षा चालवायला सुरूवात केली होती परंतु त्याच्या रिक्षाचं टायर मध्येच पक्चर झालं आणि त्यामुळे त्यानं चक्क भर रस्त्याचं टायर बदलायला सुरूवात केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला क्षणभर हसायला येईल. (viral rickshaw video rickshaw driver changes tyre while running the auto on road netizens trolls)

व्हिडीओ व्हायरल

(कृपया असा स्टंट करू नका.) सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका रिक्षाचालकानं चक्क आपली रिक्षा चालवता चालवता तिरकी केली आणि मग आपल्या सीटवरच बसला आणि मग तिथूनच रिक्षाच्या डाव्या बाजूला असलेला टायर (Tyre) काढायचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात त्याच्या मागून एक दुसरा रिक्षावाला येतो आणि नवीन टायर त्याच्या हातात देतो आणि हा रिक्षावाला आपलं टायर लावतो. असा खतरनाक स्टंट केल्यामुळे नेटकऱ्यांना त्याला ट्रोलही केले आहे. 

खतरनाक स्टंट

30 सेकंदाचा हा व्हिडीओ @finetraitt या युझरनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. सोबतच या व्हिडीओला 98 हजार लाईक्स आले आहेत. हा व्हिडीओ इतका अचूक झाला आहे की तो पाहून हा व्हिडीओ तयार केला असल्याचे समजते आहे. परंतु हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.