Bank Cheque Facts: आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण चेक प्रामुख्यानं वापरतो. बॅंकतून आपल्याला काही व्यवहार (Banking Payments) करायचे असतील तर आपण चेकचा हमखास वापरतो करतो. पैसे कुणाच्या खात्यात भरायचे असतील किंवा पैसे काढायचे असल्यास आपण चेकचा योग्य वापर करून घेतो. त्यातून चेक लिहिताना आपल्यालाही काही नियम पाळणे बंधनकारक असते. म्हणजे चेक भरताना आपली खाडाखोड होता कामा नये किंवा तारीख लिहिणं, सही करणं अशा काही गोष्टी आपल्यालाही न विसरता (Why we write only after filling amouny in cheque) करणं भाग असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट चेकवर लिहायची असते आणि ती म्हणजे रक्कम.
परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय की आपण जेव्हा चेक भरतो आणि रक्कम लिहितो तेव्हा ती रक्कम भरल्यानंतर शेवटी Only हा शब्द किंवा /- हे चिन्हच का वापरतो आणि चेक भरताना हे अनिवार्य का असते? कदाचित आपण याचा फारसा कधी विचार केला नसेल. सध्या ऑनलाईन बॅंकिंगचा जमाना आहे. त्यामुळे सगळ्यांचेच व्यवहार हे ऑनलाईन नाहीतर डिजिटल पेमेंटद्वारे होत असतात. आपले व्यवहार हे ऑनलाईन आणि डिजिटल पद्धतीनं अगदी सोप्पे होऊन गेले आहेत. त्यामुळे आपल्याला व्यवहार करतानाही अनेक गोष्टी या सोप्प्या जातात. एक क्लिक केलं की आपलं सगळं काम होऊन जातं. (why we put word only after filing amount on check here is the reason)
परंतु अजूनही अनेक लोकं हे ऑफलाईन पद्धतीनं बॅंकेचे व्यवहार करतात. म्हणजेच अजूनही अनेक लोकं हे चेक देऊन व्यवहार करताना दिसतात. त्यामुळे अशांना नेहमीच चेक भरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. चेकवर रक्कम योग्य पद्धतीनं लिहिणं, खाडोखोड न करणं, लिहिताना चुका टाळणं, सही व्यवस्थित करणं या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते.
आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यायची असते ती म्हणजे आपली आर्थिक फसवणूक तर होणार नाही ना याची. आर्थिक फसवणूक आणि चेकमध्ये रकमेच्या शेवटी only लिहिण्यामागे एकमेकांचा संबंध आहे. समजा तुम्ही 9,000 ची रक्कम लिहिलीत तर तुम्हाला nine thousand only असं अक्षरात लिहावे लागते आणि 9000/- असं आकड्यांमध्ये लिहावे लागते.
आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये याची योग्य ती जबाबदारी यातून घेता येते. only हा शब्द लिहिण्याचा उद्देश असा आहे की यातून आपली संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी असते. असं लिहिल्यानंतर कोणी दुसरी व्यक्ती त्यावर रक्कम लिहू शकत नाही.