Fact Check : 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये?

चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे.  चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते. 

Updated: Nov 17, 2022, 11:18 PM IST
Fact Check : 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Viral Polkhol : तुम्ही पित असलेली चहाची (Tea) किलोमागे किती किंमत असेल? साधारण 300 ते 400 रुपये. जास्तीत जास्त हजार. पण, असा एक चहा आहे त्याची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. या चहाने गंभीर आजारही बरे होतात असा दावा करण्यात आलाय.हा चहा खरंच एवढा महाग आहे का? याची आम्ही पडताळणी केली.मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (viral polkhol fact check expensive tea powder see full report)

या चहाची किंमत ऐकूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा चहा आहे की हिरा? ही चहा पावडर तब्बल 9 कोटी रुपये किलो दराने मिळते. ही चहा पावडर साधारण नाहीये. तर या चहामुळे गंभीर आजार बरे होतात असा दावा करण्यात आलाय. पण, ही चहा खरंच एवढी महाग आहे का? गंभीर आजार बरे होतात? या चहात असं काय आहे की एवढी महागडी आहे? याची पोलखोल करण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला या चहासंदर्भात अधिक माहिती मिळाली. त्यावेळी काय समोर आलं पाहुयात.

व्हायरल पोलखोल

चहा पावडरचे नाव डा-होंग पाओ टी आहे.  चीनमधील फुजियानमधील वुईसन भागात चहा पावडर मिळते. विशेष म्हणजे ही चहा पावडर याच भागात मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही. चहा पावडरची किंमत प्रति किलो 9 कोटी रुपये इतकी आहे.

चीनमध्ये या चहा पावडरची मोजकीच झाडे असल्याने दुर्मिळ झालीय. त्यामुळे त्यांच्याकडून वर्षभरात अतिशय कमी प्रमाणात चहा पावडर मिळते. डा-होंग पाओ टीची पाने अतिशय कमी असतात. चहा आरोग्यदायी असून, गंभीर आजारांवर परिणामकारक ठरतात असं म्हटलंय. त्यामुळे या चहाची किंमत कोट्यवधीत असली तरी अनेक जण या महागड्या चहाचा आस्वाद घेतात.