Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं

Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST
Viral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं  title=
Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today

Women Fight Video : मुंबई लोकल (Mumbai Local Video) ट्रेनमध्ये सीटसाठी महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकल ट्रेनमध्ये महिलांची अशी मारामारी काही नवीन नाही. पण अहो ही बस आहे...सीटसाठी दोन महिलांचा बसमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या धक्कादायक व्हिडीओमध्ये एकमेकांचे केस ओढत लाथा ठोसे मारत या महिला एक सीटसाठी बसमध्येच महाभारत करत आहेत. महिलांमधील हा राडा पाहून बसमधील लहान मुलं जोरजोरात रडताना ऐकू येत आहे. तुम्ही पाहू शकता, बस अगदी खचाखच भरली आहे. तरी या महिलांनी सीटवरुन एकमेकींना मारत आहेत. (Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today ) या दोन महिलांमधील भांडण नसून तुम्ही नीट व्हिडीओ पाहिलं तर 4 ते 5 महिला हाणामारी करत आहेत. 

कसलीही तमा न बाळगता, महिलांनी बसमध्येच कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. वाऱ्यासारखा हा व्हिडीओ सगळीकडे पसरतोय.  ही घटना कर्नाटकमधील असल्याचं बोलं जातं आहे. कारण हा व्हिडीओ शेअर करताना KRCTC अशा उल्लेख करण्यात आला आहे.