Muslim Scholar Spitting In Food : सोशल मीडियावर (Social Media) रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. कधी हा व्हिडीओ कोणत्या पार्टीतला असतो तर कधी लग्न संभारंभ किंवा मग असाच एखाद मजेशीर व्हिडीओ असतो. दरम्यान, सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मुस्लिम समाजातील काही लोक जेवण वाढण्याआधी त्यावर थुंकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर त्यांचे तर्तवितर्क लावत आहेत. त्यामुळे एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दिसत आहे की, मुस्लिम समाजातील काही भात आणि भाजी जेवण वाढण्याआधी त्यावर थुंकताना दिसत आहे. काही लोक असा दावा करत आहेत की मुस्लिम विद्वान जेवणात थुंकत आहेत, तर काही लोकांनी नमाज पठण केल्यानंतर थुंकत असल्याचे म्हटले आहे.
खाने में थूकने का क्या logic है भाई ?
क्या कोई समझा सकता है ?? pic.twitter.com/Zu2xmjzQcQ— Major Surendra Poonia (@MajorPoonia) January 13, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भांड्यात काढलेल्या भातावर थुंकताना दिसत आहे. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर काही लोकांनी दावा केला आहे की ती व्यक्ती अन्नावर थुंकत नाही तर फुंकत आहे. फुंकर मारत ही व्यक्ती जेवणाला अमीन करत आहे. (Trending Video)
हा व्हिडीओ शेअर करत भाजप समर्थक सुरेंद्र पुनिया म्हणाले, 'अन्नात थुंकण्याचे काय तर्क आहे? हे मला कोणी समजावून सांगेल का? कवी आलोक श्रीवास्तव यांनी या व्हिडीओवर लिहिले आहे की, ज्यांना थुंकल्यासारखे वाटत आहे त्यांच्यासाठी एखादी वडीलधारी व्यक्ती, सूफी, औलिया किंवा धार्मिक गुरु इस्लामिक परंपरेनुसार प्रार्थना करत जेवणावर फुंकर मारत त्याला देवाचा आशीर्वाद देत पवित्र करतात. याचा अर्थ जेणेकरून तुमच्या घरात कधीच अन्नाची कमी होणार नाही आणि तुमच्या घरी येणारे पाहूणे उपाशी जाणू नये.
भाई @MediaHarshVT प्रणाम, आप अगर आपसी सौहार्द को बल देने की बात कर रहे हैं, तो सबसे पहले तो हमें एक-दूसरे को समझने की ज़रूरत है, जिसकी कमी हर दौर में रही है. इस दौर में तो और भी मुश्किल है. जो समझा सकें, दोनों तरफ़ के ऐसे अधिकतर समझदार अब ज़ियादातर ख़ामोश ही रहते हैं. https://t.co/Uz13PSMr38
— Aalok Shrivastav (@AalokTweet) January 14, 2023
यावर उत्तर देत आलोक श्रीवास्तव म्हणाले, जर तुम्ही परस्परांमधील नाते मजबूत करण्याविषयी बोलत असाल तर सगळ्यात आधी तुम्ही एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, ज्याची प्रत्येक युगात कमतरता आहे. या युगात ते आणखी कठीण आहे. ज्यांना समजावून सांगता येईल, दोन्ही बाजूचे समजूतदार लोक आता बहुतेक गप्प बसतात.
हेही वाचा : Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ आताचा नाही तर नोव्हेंबर 2022 चा आहे. तर रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ केरळचा असल्याचे म्हटले जाते. हा व्हिडीओ 29 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे.