VIDEO : जेव्हा कोबरा सापाने आपल्या तोंडाने बाहेर टाकली सात अंडी

केरळमधील एकाने हैरान करणारा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड केलाय.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2018, 02:09 PM IST
VIDEO : जेव्हा कोबरा सापाने आपल्या तोंडाने बाहेर टाकली सात अंडी  title=

कोची : केरळमधील एकाने हैरान करणारा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड केलाय. या व्हिडिओत एक साप तोंडाने सात अंडी बाहेर टाकताना दिसत आहे. एका शेतकऱ्यांने कोंबड्यांसाठी पिंजरा केला होता. या कोंबड्यांच्या पिंजऱ्यावर कोबरा सापाने हल्ला केला, त्यावेळी ही घटना उजेडात आली. पिंजऱ्यातील अंड्यांवर कोबराने ताव मारला. कोबराने सात अंडी गिळंकृत केली.

सुजिथ याला कोबरा कोंबड्यांच्या पिंजऱ्यात घुसल्याची माहिती मिळाली. त्याने पिंजऱ्याकडे धाव घेतली आणि पिंजऱ्यातील कोबरा सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी कोबरा साप बाहेर पडला. त्याचवेळी त्याने सात अंडी तोंडाने बाहेर टाकलीत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्याने तयार केला आणि तो फेसबूकवर अपलोड केलाय. हा व्हिडिओ ५५ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. केरळचा राहणारा सुजिथ साप पकडण्यात माहीर आहे.

सुजिथने सांगितले की, एक कोबरा साप कोंबड्यांच्या पिंजऱ्यात घुसल्याची माहिती मिळाली. माहिती घेतली असता पिंजऱ्यातील एका कोंबडीला कोबराने डंख मारला. त्यानंतर कोंबडी मरण पावली. त्यानंतर कोबरा सापाने तिची अंडी फस्त केली. मात्र, कोबरा सापाला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर सापाने सातही अंडी तोंडाने बाहेर टाकलीत.

पिंजऱ्या बाहेर या सापाला बाहेर काढल्यानंतर तो घाबरला आणि त्यांना तोंडाने गिळलेली अंडी बाहेर टाकण्यास सुरुवात केली आणि सापाने तेथून पळ काढला.