गायकावर पैशांचा पाऊस, व्हिडिओ व्हायरल

नोटा उधळतानाचा व्हि़डिओ व्हायरल

शैलेश मुसळे | Updated: Apr 15, 2018, 01:26 PM IST
गायकावर पैशांचा पाऊस, व्हिडिओ व्हायरल title=

गांधीनगर : देशात गरीबी आणि बेरोजगारीच्या बातम्या जरी रोज येत असल्या तरी गुजरातमध्ये एका गायकावर नोटा उधळण्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील नवसारी भागात हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायक हा गातो आहे आणि लोकं त्याच्यावर नोटा उधळत आहेत.

व्हिडिओमध्ये स्टेजवर गायक किर्तिदन गादावी आपल्या सहकाऱ्यांसोबत गाणं गात आहेत. त्यांच्यासोबत आयोजनकर्ते आणि अन्य काही लोकं देखील बसले आहेत. दर्शकांमधील काही लोकं त्यांच्यावर पैशांची उधळन करत आहेत. एक तरुणी देखील गायकावर नोटा उधळताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.