Valentines Day 2023: सिंगल असणाऱ्यांसाठी खूशखबर! 'व्हॅलेंटाईन डे'ला फक्त या गोष्टी करा, पार्टनर मिळालाच समजा...

Relationship Tips for Singles: व्हॅलन्टाईन डे (Velantine's Day) अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्याआधी 7 फेब्रुवारीपासून विविध डेज साजरे करण्यात येत आहेत. त्यातून आता वातावरण सगळीकडेच खूप सुंदर आणि रोमॅण्टिक असल्यानं फिरण्यासाठीही बरेच ऑप्शन तयार झाले आहेत.

Updated: Feb 10, 2023, 05:40 PM IST
Valentines Day 2023: सिंगल असणाऱ्यांसाठी खूशखबर!  'व्हॅलेंटाईन डे'ला फक्त या गोष्टी करा, पार्टनर मिळालाच समजा... title=

Relationship Tips for Singles: आता सगळीकडेच चर्चा आहे ती व्हॅलन्टाईन डेची. त्यामुळे सगळेच जणं आपापल्या पार्टनरसोबत व्हॅलन्टाईन डे (Valentines Day) साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आपल्यालाही दरवर्षी असंच वाटतं राहतं की आपणही आपल्या पार्टनरसोबत मस्त कुठेतरी फिरायला जावे आणि छान कुठेतरी एन्जॉय करावे. आपल्याला आपल्या पार्टनरसोबत अशा ठिकाणी जायची इच्छा असते जेणेकरून एकमेकांसोबत आपण एकत्र वेळ घालवू शकतो. व्हॅलन्टाईन डे अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्याआधी 7 फेब्रुवारीपासून विविध डेज साजरे करण्यात येत आहेत. त्यातून आता वातावरण सगळीकडेच खूप सुंदर आणि रोमॅण्टिक असल्यानं फिरण्यासाठीही बरेच ऑप्शन तयार झाले आहेत. त्यासाठी आता तुमच्याकडेही बरेच ऑप्शन खुले झाले आहेत. 

'काऊ हड डे'चं औचित्य: 

भारतीय पशु कल्याण बार्डनुसार, व्हॅलन्टाईन डेला लोकांसाठी एक अपील करण्यात आले आहे. त्यात असं म्हटलं आहे की, 14 फेब्रुवारीला तुम्ही काऊ हग डे साजरा करू शकता. ही एक पाश्चात्त्य संस्कृती आहे. जी जगाच्या बऱ्याच भागात साजरी केली जाते. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीला यादिवशी हग करा मग तुम्हाला का नाही कोणी पार्टनर (Partner) मिळेल?  

'या' ठिकाणी जा फिरायला: 

आपल्या देशातच फिरण्यासाठी अनेक गोष्टी आहे परंतु तुम्ही अशा ठिकाणी आवर्जून जाऊ शकता जिथे तुमच्यासाठी अनेक ऑप्शन्स एक्सप्लोअर करू शकता. तेव्हा तुम्हाला फक्त पबिंंग किंवा पार्टींगचेच ऑप्शन नसून तुम्ही अनेकप्रकारे विविधप्रकारे गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही कुठेकुठे फिरू शकता आणि कोणकोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. बार एण्ड किचनमध्ये तुम्ही तुमच्या मस्तपैकी ब्रंचला नाहीतरी डिनर डेटला (Dinner Date) जाऊ शकता. त्याचबरोबर येथे तुम्ही जर का सिंगल असाल तर तुम्ही येथे एकटे गेलात तर तुम्हाला कोणतातरी पार्टनरही भेटू शकतो. तेव्हा आपण जाणून घेऊयात की तुम्ही येथे कसा वेळ घालवू शकता आणि किती वेळ स्पेंड करू शकता. येथे गेल्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा मेन्यू ऑर्डर करू शकता. एक म्हणजे तुम्ही दुपारपासून ते रात्रीपर्यंत कधीही अशा रेस्टोरंट्समध्ये टाईम स्पेंड करू शकता. 

आपली स्पेस शोधा : 

आपल्या सगळ्यांनाच नाही म्हटलं तरी मी टाईम हा हवाच असतो त्यामुळे आपण त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असतो आपल्या अनेकदा आपला मी टाईम मिळत नाही आणि रिलेशनशिपमध्ये (Relationships tips) तर नाहीच नाही. त्यामुळे आपल्याला अशाच काही लोकेशनचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही काही कॅफेजमध्येही जाऊ शकता.