मुंबई : 14 फेब्रुवारी, हा दिवस दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असतो. ते या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि त्याच्यासोबत रोमॅन्टीक वेळ घालवतात. प्रत्येकाची कहीणी ही त्यांच्यासाठी खास असते. हेच ते क्षण असताता, जे हे प्रेमी युगुल नेहमीच आपल्या आठवणीत ठेवताता आणि या आठवणी संपूर्ण आयुष्य घालवतात. या प्रसंगी एक अशी प्रेमकहाणी समोर आली आहे. जी क्वचित काही लोकांना माहित असेल.
ही प्रेमकहाणी आहे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार केकी मूस यांची. त्यांच्या या अनोखी प्रेम कहाणीचा संबंध ट्रेनशी आहे. दररोज ट्रेन आल्याशिवाय ते कधीही जेवत नसत. ऐवढेच काय तर ती ट्रेन स्टेशनवर येऊन गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून नेहमी अश्रू येत असत. पण आता हे ऐकुन तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, यामध्ये प्रेम कहाणी कुठेय?
तर केकी मूस यांची खरी कहाणी तर पुढे सुरु होते. खान्देशातील कलामहर्षी केकी मुस यांनी आपल्या प्रेयसीची तब्बल 50 वर्ष म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली.
ते तब्बल 50 वर्षे एखाद दुसरा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेर देखील पडले नाही. ते नेहमी आपल्या प्रेयसीची वाट पाहात असतं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या प्रेमीकेची वाट पाहिली. प्रेमात या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!
मुंबई येथील विल्सन कॉलेजमधून केकी मुस यांनी कलेची पदवी घेतली. यादर्मान्य त्यांचं निलोफर नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. सुरुवातीला निलोफर आणि त्यांच्यात फक्त मैत्री होती, परंतु ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे केकी मुस यांना कळलंच नाही.
शिक्षण झाल्यानंतर केकी मुस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आईवडील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना निलोफरला सोडून जावं लागणार होतं.
केकी मुस घरी जाण्यासाठी जेव्हा मुंबईच्या व्हिटी रेल्वे स्टेशनवर गेले, तेव्हा तेथे त्यांना भेटण्यासाठी निलोफर आली. तिने केकी मुस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिले की, ती एक दिवस नक्की पंजाब मेल ने चाळीसगावला येईल आणि मग आपण सोबत जेवण करू.
नंतर चाळीसगाव येथे आल्यावर केकी मुस यांनी निलोफर येणार म्हणून संपूर्ण घर सजवलं, बगिच्यातील फुलांचा पुष्पगुच्छ तयार केला. परंतु निलोफर काही आली नाही. त्यानंतर पुढील 50 वर्ष ते दररोज न चुकता निलोफरची वाट पाहत असत.
केकी मुस यांचे निलोफरवर खरे प्रेम होते. त्यामुळे 50 वर्ष न चुकता ते निलोफर ची वाट पाहत असत. रोज रात्री पंजाब मेल गेल्याशिवाय ते कधीही जेवत नसत. रोज त्या दिवसप्रमाणे कागदाचा पुष्पगुच्छ बाहेर काढून ते निलोफरची आणि पंजाब मेल गेली की, मग ते जेवण करत असत. गेली 50 वर्ष त्यांनी निलोफ़रची वाट पाहिली आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वासापर्यंत त्यांनी तिची वाट पाहिली.
निलोफर आणि त्यांचं प्रेम खरं होतं, ज्यामुळे त्यांचा निलोफरच्या वचनावर खूप विश्वास होता, त्याच आशेवरती त्यांनी आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. परंतु निलोफार कधी आलीच नाही.