१ लाख लोकांचं गहाण सोनं स्वस्तात घेण्याची संधी

कोरोना काळात गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात येणार आहे

Updated: Feb 14, 2022, 06:17 PM IST
१ लाख लोकांचं गहाण सोनं स्वस्तात घेण्याची संधी title=

मुंबई : कोरोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले. पडत्या काळात अनेकांनी घरातील सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलं. पण नोकरी नसल्याने कर्ज फेडणाच्या कोणताही पर्याय अनेकांकडे नव्हता. 

अशा फेडता येत नसलेल्या लाखो कुटुंबांच्या सोन्याचा बुधवारी म्हणजे 16 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. एनबीएफसी आणि सोने कर्ज देणाऱ्या बँका बुधवारी या सोन्याचा लिलाव करणार आहेत. मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यांच्याकडून सर्वाधिक सोन्यावर कर्ज घेण्यात आलं आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर किमतीच्या 70 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जातं. यात कर्जदाराला तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. सोने तारण कर्जात परतफेड न केल्यास वसुली करणे अतिशय सोपे जाते. कर्जदाराचे सोने विकून कर्ज वसूल केलं जातं. 

देशातील 18 शहरांमध्ये लिलावाच्या 59  नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात चेन्नई, बंगळुरू आणि कोचीत प्रत्येकी 12, विजयवाडा 3, हैदराबाद 2 आणि मुंबई 2 ठिकाणी हा लिलाव होणार आहे.